शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विद्युत खांबांवर शिवसेना लावणार कंदिल

By admin | Updated: June 9, 2014 00:11 IST

जालना: गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असून शिवसेनेच्या वतीने विद्युत खांबांवर कंदिल लावण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी म्हटले आहे.

जालना: शहरातील पथदिवे गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असून शिवसेनेच्या वतीने विद्युत खांबांवर कंदिल लावण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी म्हटले आहे.
अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण पथदिवे बंद असल्यामुळेच वाढले आहे. महिला व तरूण मुलींना रात्री घराबाहेर पडण्यास भीती वाटते. बस-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री-अपरात्री शहरात आल्यानंतर अंधाराचा गैरफायदा घेऊन लुटण्याचे प्रकार घडत आहेत. शहर अंधारात असताना पालिकेला मिळालेल्या आयएसओ प्रमाणपत्राबद्दलही अंबेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
गेल्या दीड वर्षात सर्वधर्मियांनी आपापले सण, उत्सव समारंभ अंधारातच साजरे केले आहेत. शिवसेनेने यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन शहरातील अंधाराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. चौकाचौकात हायमास्ट दिवे लावून पैशाचा अपव्यय केला जात असल्याचा आरोपही अंबेकर यांनी केला आहे. हे हायमास्ट दिवे उभारण्याऐवजी वीज वितरण कंपनीचे वीज बिल भरून सर्व पथदिवे सुरू करावेत. या मागणीकडे लक्ष देऊन चार दिवसांत पथदिवे सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने विद्युत खांबांवर कंदील लावून आंदोलन केले जाणार असल्याचेही नमूद केले.