औरंगाबाद-पुणे मार्गासाठी एक शिवनेरी बस दाखल

By Admin | Updated: September 8, 2014 00:34 IST2014-09-08T00:18:02+5:302014-09-08T00:34:34+5:30

औरंगाबाद : प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असलेल्या औरंगाबाद- पुणे मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून ११ शिवनेरी बस धावत आहेत. यामध्ये आता आणखी एका शिवनेरी बसची भर पडली आहे

A Shivneri bus file for Aurangabad-Pune route | औरंगाबाद-पुणे मार्गासाठी एक शिवनेरी बस दाखल

औरंगाबाद-पुणे मार्गासाठी एक शिवनेरी बस दाखल

औरंगाबाद : प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असलेल्या औरंगाबाद- पुणे मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून ११ शिवनेरी बस धावत आहेत. यामध्ये आता आणखी एका शिवनेरी बसची भर पडली आहे. पुणे- मुंबई मार्गावरील ही शिवनेरी बस आता औरंगाबाद- पुणे मार्गावर धावणार आहे. याशिवाय लवकरच आणखी एक शिवनेरी बस औरंगाबाद- पुणे मार्गासाठी दाखल होणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबाद- पुणे मार्गावर महामंडळाने खाजगी एजन्सीमार्फत शिवनेरी बससेवा सुरू केल्यानंतर प्रारंभी पुणे- औरंगाबाद मार्गावर सहा आणि औरंगाबाद- पुणे मार्गावर सहा शिवनेरी बस धावत होत्या. ऐन उन्हाळी हंगामात दोन शिवनेरी बसची मुदत संपल्यामुळे त्या बंद पडल्या. उत्पन्नात भर घालणाऱ्या हंगामात केवळ दहा बसची सेवा सुरू होती. अशातही एक बस अपघातामुळे बंद पडली. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी गाड्यांची संख्या ९ झाली. त्यामुळे दररोज चार ते पाच फेऱ्या रद्द होऊन प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले. प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता एक शिवनेरी बस जूनमध्ये औरंगाबाद- पुणे मार्गासाठी दाखल झाली. तसेच अपघातग्रस्त शिवनेरीही पूर्ववत सेवेत रुजू झाली. प्रवाशांची सकाळी व सायंकाळी प्रवासाला अधिक पसंती असते. नेमक्या याच वेळी फेऱ्या रद्द होण्याच्या समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी पुणे- मुंबई मार्गावरील शिवनेरी बस औरंगाबाद- पुणे मार्गासाठी दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ आगार व्यवस्थापक प्रताप जाधव यांनी दिली.

Web Title: A Shivneri bus file for Aurangabad-Pune route