शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्याभिषेकदिनीच रोवली लोकशाहीची मुहूर्तमेढ

By admin | Updated: June 7, 2014 00:25 IST

नांदेड : शिवराज्याभिषेक उत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असून याच दिवशी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवल्या गेली, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष एकनाथराव पावडे यांनी केले़

नांदेड : शिवराज्याभिषेक उत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असून याच दिवशी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवल्या गेली, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष एकनाथराव पावडे यांनी केले़ मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ६ जून रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ पंडितराव पवळे, इंजि़ शिवाजीराजे पाटील, श्यामसुंदर शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या महानगर अध्यक्षा डॉ़ रेखा पाटील गोर्लेगावकर, संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष संकेत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले़ यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले़ पावडे म्हणाले, बहुजन हृदयसम्राट युवराज छत्रपती संभाजीराजेंच्या प्रयत्नामुळे संपूर्ण देशात ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सवात रूपांतरित झाला़ शिवराज्याभिषेक दिन हा दिवस राष्ट्रीय सन म्हणून साजरा करण्याचा संकल्प बहुजनवादी संघटनानी केल्याचे त्यांनी सांगितले़ छत्रपती शिवाजी महाराज हे ६ जून १६७४ रोजी स्वराज्याचे राजे झाले, त्यांनी अठरापगड जातीतील लोकांना सोबत घेवून राज्य केले, असे विचार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा़ डॉ़ गणेश शिंदे यांनी व्यक्त केले़ शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास विविध जाती-धर्मासह इंग्रजांची उपस्थिती, असेही ते म्हणाले़ कार्यक्रमास डॉ़ सोपान क्षीरसागर, डॉ़ एस़ बी़ चव्हाण, गणेश भायेगावकर, गणेश मोरे, श्रीनिवास शेजुळे, सिद्धार्थ मुळे, गणेश पावडे, बळीराम जाधव, मारोती देशमुख, गजानन कहाळेकर, मारूती देशमुख, जयश्री भायेगावकर, सविता पावडे, ज्योती पाटील, शिल्पा भोसले आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन इंजि़ शिवाजीराजे पाटील यांनी तर डॉ़ रेखा पाटील यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)