हिंगोली : जिल्हा पोलीस दलातील सहायक फौजदार शंकर लक्ष्मणराव देवकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. कळमनुरी येथील मूळ रहिवासी असलेले शंकर देवकर यांची २० आॅगस्ट १९७९ रोजी परभणी जिल्हा पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदावर निवड झाली. परभणी, हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. पाच वर्षे अॅन्टी करप्शन ब्युरोमध्ये काम करताना लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरूध्द ४० सापळे रचून कारवाई करण्यात त्यांचा सहभाग होता. गुन्हे तपासासाठी त्यांना आतापर्यंत ३१० बक्षिसे मिळाली आहेत. हिंगोली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या कार्यालयात सध्या सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर देवकर काम करीत आहेत. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}