शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासात पळविले महिलेचे सतरा तोळ्यांचे दागिने

By admin | Updated: November 4, 2014 01:39 IST

औरंगाबाद : आजारी मुलाच्या उपचारास पैसे लागत असल्याने गहाण ठेवण्यासाठी आणलेले एका महिलेचे सतरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले.

औरंगाबाद : आजारी मुलाच्या उपचारास पैसे लागत असल्याने गहाण ठेवण्यासाठी आणलेले एका महिलेचे सतरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले. ही घटना औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये घडली.घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, ठाणे येथील रहिवासी असलेल्या मेघा रमेश निंभोरकर यांचा लहान मुलगा आजारी आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे आपले सोन्याचे दागिने माहेरी कुणाकडे तरी गहाण ठेवावेत आणि त्यातून मिळणाऱ्या पैशात मुलावर उपचार करावेत, असा विचार निंभोरकर यांनी केला. त्यांचे माहेर अमरावतीला आहे. त्या स्वत:चे १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन मुलासोबत अमरावतीला गेल्या. मात्र, व्यवहार जुळला नाही. त्यामुळे दागिने परत घेऊन त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. बसने शनिवारी दुपारी त्या अमरावतीहून औरंगाबादला आल्या. काही वेळ येथील मध्यवर्ती बसस्थानकावर थांबल्यानंतर नाशिकमार्गे जाण्यासाठी त्या बसमध्ये बसल्या. काही वेळानंतर त्यांनी पर्समध्ये ठेवलेले दागिने सुरक्षित आहेत की नाही, हे पाहिले असता पर्समधील दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीत संधी साधून आपले सतरा तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचे लक्षात आल्यानंतर नाशिकहून त्या परत औरंगाबादला आल्या आणि क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून त्यांनी दागिने चोरीची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी सांगितले.