सुरुवातीला विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी अर्ज स्वीकारण्यात आले. सर्वच समित्यांच्या सभापतीपदासाठी प्रत्येक एकच अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे सभापतींची निवड बिनविरोध होत असल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानुसार शिक्षण व क्रीडा समिती सभापतीपदी उल्हास ठोंबरे, स्वच्छता व वैद्यकीय समितीच्या सभापतीपदी ज्योती टेके, पाणी पुरवठा सभापतीपदी इम्रान कुरेशी, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी शेख मुमताजबी व उपसभापतीपदी नंदाबाई त्रिभुवन, नियोजन समितीपदी अनिता तांबे, स्थायी समिती सदस्यपदी राजूसिंह राजपूत यांची निवड झाली आहे. नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, गटनेते प्रकाश चव्हाण, दशरथ बनकर, नगरसेवक स्वप्निल जेजुरकर, शैलेश चव्हाण, रियाजभाई, बजरंग मगर, राजू गायकवाड, गोकुळ भुजबळ, पारस घाटे, सखाहरी बर्डे आदींची उपस्थिती होती.
--------
फोटो : नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी विषय समित्यांच्या नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.
210921\save_20210921_155453~2.jpg
फोटो