शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

कैलास लेणी पाहताच जेफ बेजोस यांनी उच्चारले... ‘ओह अमेझिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 08:41 IST

सामान्य पर्यटकांसारखा वावर : जगप्रसिद्ध अ‍ॅमेझॉन कंपनीच्या संस्थापकांची वेरूळ लेणीला भेट

नजीर शेख/रमेश माळी

औरंगाबाद/वेरुळ : आॅनलाईन शॉपिंगमधील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’चे संस्थापक आणि सीईओ जेफरी प्रेस्टन बेजोस उर्फ जेफ बेजोस यांनी शनिवारी दुपारी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहिल्या. कैलास लेणी पाहताच त्यांच्या तोंडून ‘ओह अमेझिंग’ असे शब्द उमटले.
जेफ बेजोस हे सुमारे दोन तास वेरूळ येथील लेण्या पाहण्यात दंग होऊन गेले होते. खाकी रंगाची बर्म्युडा आणि पांढरा शर्ट या पेहरावातील बेजोस हे खास वेरूळ लेण्या पाहण्यासाठीच आले होते. या भेटीत बेजोस यांनी सर्वसाधारण पर्यटकांप्रमाणे लेणी पाहण्याचा आनंद लुटला. त्यांनी वेरूळ येथील १०, १५, १६ (कैलास लेणी) आणि ३२ क्रमांकाची लेण्या पाहिल्या. त्यांच्यासोबत अतिविशेष किंवा इतर अशी कोणतीच सुरक्षाव्यवस्था नव्हती. त्यांच्यासमवेत काही सुरक्षारक्षक मात्र होते. ते वेरूळ येथे येत असल्याबाबतचा कुठला प्रोटोकॉलही नव्हता. इतर पर्यटकांप्रमाणेच त्यांनी लेण्या पाहिल्या. ते आणि त्यांचे कुटुंबिय बराच वेळ फोटो काढण्यातच दंग होते. त्यांना लेण्यांबाबत माहिती देण्यासाठी अलीम कादरी हे गाईड होते. जेफ बेजोस यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मॅकेंझी टटल तीन मुले व एक मुलगी असा परिवार होता. त्यांचा सहायक असलेला तरुणही सतत त्यांच्या मागे-पुढे आणि समवेत चालताना दिसला. काही वेळा लेणी पाहण्यासाठी आलेले इतर पर्यटक त्यांच्या अगदी जवळूनही गेले. सुरक्षा रक्षकांमुळे ते ‘व्हीआयपी’ पाहुणे असल्याचे पर्यटकांच्या लक्षात येत होते. मात्र त्यांच्या सर्वसामान्यांप्रमाणेच वावरण्यामुळे त्यांनी इतरांना प्रभावित केले. यावेळी त्यांनी काही पर्यटकांशी संवादही साधला. दुपारी दोन वाजता लेण्यांमध्ये पोहोचलेल्या बेजोस आणि त्यांच्या फॅमिलीने ४.३० वाजता लेणी सोडली.

२० वर्षांपूर्वीही आले होते
जेफ बेजोस यांच्याबाबतीत आणखी एक माहिती मिळाली की, सुमारे २० वर्षांपूर्वी ते वेरूळ लेणी पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी ते एकटेच आले होते आणि अर्थातच त्यांची अ‍ॅमेझॉन कंपनीही नव्हती. वीस वर्षांपूर्वी पाहिलेल्या वेरूळच्या आठवणी त्यांनी शनिवारच्या भेटीत पुन्हा जागविल्या.

लेणींचा केला अभ्यास
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेफ बेजोस यांनी लेणींना भेट देण्यापूर्वी या लेण्यांचा अभ्यास केला. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले आणि नंतर त्यांनी लेणींना भेट दिली. ते मृदू स्वभावाचे आहेत. त्यांनी लेणी पाहताना अधिक भाष्य केले नाही. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यावर त्यांनी भर दिला.

दोन दिवसांपूर्वी रेकी
जेफ बेजोस यांच्या वतीने त्यांच्या खाजगी सुरक्षा यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळ, वेरूळ लेणी परिसराची रेकी केली होती. आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्या हॉस्पिटलची गरज पडलीच, तर त्यासाठीही शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय (घाटी)सह दोन खाजगी हॉस्पिटल्सची सुरक्षा यंत्रणेने पाहणी केली होती.

 

जेफ बेजोस यांचे पाच तास..
शनिवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी जेफ बेजोस औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावर त्यांच्या खाजगी आणि आलिशान विमानाने आले.
१.०५ वा. - वेरुळला जाण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंबीय दोन आलिशान वाहनांमध्ये बसले.

२.०५- वेरुळ लेणी येथे पोहोचले.

४.३० - वेरुळ लेणीहून औरंगाबाद विमानतळाकडे निघाले.

५. ४० वा. - औरंगाबाद विमानतळावर आगमन.

६.०० वा. - खाजगी विमानाने वाराणसीकडे रवाना.

टॅग्स :Aurangabad caveऔरंगाबाद लेणी