शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवीन जागेचा शोध थांबला...!

By admin | Updated: October 13, 2014 00:34 IST

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाकडून गेल्या वर्षभरापासून नव्या जागेचा शोध घेतला जात आहे;

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाकडून गेल्या वर्षभरापासून नव्या जागेचा शोध घेतला जात आहे; परंतु राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आगामी काळात बंद होणार असल्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्र्यांनी आॅगस्ट महिन्यात दिले. यामुळे आरटीओ कार्यालयासाठी नव्या जागेचा शोध थांबविण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. कार्यालयात दररोज येणारी वाहने आणि जप्त केलेली अवजड वाहने उभी करण्यास जागा अपुरी पडत आहे. पुरेशा जागेअभावी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते, त्या ट्रॅकजवळ अवजड वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या विविध अडचणी लक्षात घेऊन गेल्या वर्षभरापासून कार्यालयासाठी जागेचा शोध घेण्यात आला. यामध्ये पाहण्यात आलेल्या जागा मिळण्यास अडचणी आल्याने जागेचा शोध सुरूच राहिला. दरम्यान, आॅगस्ट महिन्यात आरटीओ कार्यालयात फक्त लक्ष्मीदर्शनाचा खेळ चालतो अशी टीका करीत आरटीओऐवजी अत्याधुनिक तंत्राचा आधार घेऊन दुसरी प्रभावी यंत्रणा सुरू करण्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे आरटीओऐवजी सुरू होणाऱ्या नवीन व्यवस्थेबाबत उत्सुकता वाढली आहे. अशा परिस्थितीत आरटीओ कार्यालयासाठी नव्या जागेचा शोधही थांबविण्यात आल्याचे दिसत आहे. याविषयी आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काळानुरूप बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.