शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत नळ जोडण्यांचा मनपाकडून शोध

By admin | Updated: December 8, 2015 00:06 IST

आशपाक पठाण , लातूर पाणीटंचाईची ओरड दिवसेंदिवस वाढत असल्याने मनपा प्रशासनाला जाग आली आहे़ अनेक ठिकाणी एकाच डिमांडवर २ ते ५ जोडण्या घेऊन पाणी

आशपाक पठाण , लातूरपाणीटंचाईची ओरड दिवसेंदिवस वाढत असल्याने मनपा प्रशासनाला जाग आली आहे़ अनेक ठिकाणी एकाच डिमांडवर २ ते ५ जोडण्या घेऊन पाणी घेणाऱ्यांच्या जोडण्या बंद करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने २० जणांचे पथक तयार केले आहे़ त्यानुसार शाखा अभियंत्यांच्या नेतृत्वात विभागनिहाय अचानक मोहीम राबविण्यात येणार असून यातून अनधिकृत जोडण्या बंद केल्या जाणार आहेत़लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पाने तळ गाठल्याने पाण्याची आवक घटली आहे़ परिणामी, अत्यंत तोलून मापून मिळणाऱ्या पाण्याचे वितरण मनपाकडून व्यवस्थित होत नसल्याने पाणीपुरवठा विभागावर नागरिकांचा रोष वाढत आहे़ दहा दिवसाला नळाला येणारे पाणी ठराविक लोकांना दिवसभर मिळते तर काहीजणांच्या नळाला थेंबही येत नाही़ पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी एकदा व्हॉल्व फिरविला की, निवांत झोप घेतात़ कुठे पाणी येतेय अन् कुठे नाही, याची खबरदारी कोणीच घेत नाही़ नागरिकांनी पाण्यासाठी तक्रार केल्यावर वरिष्ठांकडून होकार मिळतो पण आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही़ पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींचा मनपात पाऊस सुरू आहे़ पाणी पुरवठा विभागाकडून तक्रारीची दखलही घेतली जात नसल्याने मनपात येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्या महिलांचा टक्का वाढत आहे़ पाणी गळती आणि अनधिकृत जोडणी बंद केल्यास पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, या अपेक्षेने मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून २० जणांचे पथक कामाला लावण्यात आले आहे़ ३० नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी आदेश काढला असून ७ दिवस लोटले तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही़ शाखा अभियंता एस़एऩ काझी म्हणाले, सरस्वती कॉलनी, खाडगाव रोड, समता नगर भागात १३ अनधिकृत नळ जोडण्यांचे कनेक्शन बंद करण्यात आले आहे़ दोन दिवसांत मोहिमेला गती येईल़ त्यानंतर अनाधिकृत कनेक्शन तोडून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे़ लातूर शहर पाणीपुरवठा योजना सुरळीत चालविण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत़ सर्व जलकुंभावरील अनधिकृत नळ जोडण्यांचा शोध घेऊन त्याची नोंदणी करणे, रजिस्टरमध्ये नोंद झाल्यावर त्याच्या याद्या तयार करणे, तसेच तात्काळ जोडणी बंद करण्याची कार्यवाही संबंधित जलकुंभावरील पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांच्या मार्गदर्शनात करण्याच्या सूचना नगर अभियंत्यांनी दिल्या आहेत़ शाखा अभियंता यु़डी़ स्वामी, एस़एनक़ाझी, पी़सी़घंटे, आऱ एम़मुंढे, डी़डी़ बिराजदार, श्रीमती यु़ एच़ शिंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही मोहीम राबविण्यात येणार असून एकाच वेळी २० कर्मचारी संबंधित भागात मोहीम राबवतील, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी़जी़यादव यांनी दिली़