शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

By admin | Updated: May 19, 2014 01:32 IST

औरंगाबाद : वाळूची वाहतूक करणार्‍या भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वारास चिरडल्याची हृदयद्रावक घटना बीड रोडवरील भालगाव फाट्याजवळ रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

औरंगाबाद : वाळूची वाहतूक करणार्‍या भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वारास चिरडल्याची हृदयद्रावक घटना बीड रोडवरील भालगाव फाट्याजवळ रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त ट्रक एवढ्या वेगात होता की समोरून येणार्‍या मोटारसायकलला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून तो ट्रक रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन उलटला. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेषराव विनायक घोरपडे (४८, रा. पिंप्रीराजा), असे मयत मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. तो रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवर (क्र. एमएच-२० एक्स-४०७२) बसून पिंप्रीराजाकडे निघाला होता. त्याचवेळी बीडकडून वाळू घेऊन येणारा ट्रक (क्र. एमएच-२० सीटी-४४२२) औरंगाबाद शहराच्या दिशेने चालला होता. औरंगाबाद- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाट्याजवळ रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सदरील भरधाव ट्रकने समोरून येणार्‍या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार शेषराव विनायक घोरपडे हे ट्रकच्या चाकाखाली आले. त्यांच्या दोन्ही पायांचा चुरा झाला. या अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे जमादार शेख शकील, सुनील गोरे व काही नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमी शेषराव घोरपडे यांना तात्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळाचे दृश्य एवढे विदारक होते की, अपघात झाल्यानंतर वाळूने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन उलटला. अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक तेथून पळून गेला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. रात्रीची वेळ असल्यामुळे पोलीस व नागरिकांना मदत करण्यास मोठी अडचण जात होती.