उद्यापासून तीन दिवस समृध्दी महामार्ग राहणार साडेतीन तास बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

By विकास राऊत | Published: October 30, 2023 07:59 PM2023-10-30T19:59:15+5:302023-10-30T19:59:24+5:30

बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे

Samruddhi Mahamarga will be closed for three and a half hours from Tuesday to Thursday | उद्यापासून तीन दिवस समृध्दी महामार्ग राहणार साडेतीन तास बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

उद्यापासून तीन दिवस समृध्दी महामार्ग राहणार साडेतीन तास बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक मंगळवार ३१ ऑक्टोबर, बुधवार १ नोव्हेंबर व गुरुवार २ नोव्हेंबर या तीन दिवसांत दुपारी १२ ते साडे तीन यावेळेत बंद असेल. उर्वरित वेळेत वाहतुक सुरळीत सुरु राहील.

बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी कळविले आहे. बंद काळात जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज ते सावंगी इंटरचेंज दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक निधोना इंटरचेंज मधून बाहेर पडेल. निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग मार्गे केंब्रीज शाळेपासून वाहतुक उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज येथे समृद्धी महामार्गावरून शिर्डीकडे रवाना होईल. तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज येथून विरुद्ध दिशेने निधोना इंटरचेंज येथून महामार्गावर प्रवेश करील. तेथून नागपूरकडे रवाना होईल. असे खलसे यांनी कळविले आहे.

Web Title: Samruddhi Mahamarga will be closed for three and a half hours from Tuesday to Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.