शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निधी संपविण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

By admin | Updated: April 1, 2016 01:02 IST

परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये गुरुवारी मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर लेखा विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ पहावयास मिळाली़ आर्थिक वर्षाचा शेवटचा लेखाजोखा जुळविण्यात अधिकारी मग्न होते़

परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये गुरुवारी मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर लेखा विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ पहावयास मिळाली़ आर्थिक वर्षाचा शेवटचा लेखाजोखा जुळविण्यात अधिकारी मग्न होते़ तर निधी खर्चासाठी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयाशी अधिकाऱ्यांचा संपर्क सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले़ जिल्ह्याच्या विकास कामांसाठी शासनाकडून येणाऱ्या निधीचा ताळमेळ वर्षाअखेरीस लावला जातो़ हा निधी खर्च न झाल्यास परत जाण्याची शक्यता असल्याने ३१ मार्च रोजी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये आकडेमोडीचा खेळ सुरू असतो़ तो यावेळेसही पहावयास मिळाला़ आॅनलाईन प्रणाली विकसित झाल्याने दोन वर्षांपासून बिले आणि दप्तर घेऊन खर्च मंजूर करण्यासाठी होणारी धावपळ यावेळेस दिसली नसली तरी कोषागार कार्यालयाकडे आॅनलाईन बिले टाकण्यासाठी अधिकारी, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कामात होते. सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांचा राबता होता़ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ही आर्थिक विकासाची नाडी असलेली कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील आर्थिक लेखे कोषागार कार्यालयातून मंजूर होतात़ यावर्षी ३० मार्च रोजीच बहुतांश बिले काढण्यात आली आहेत़ ३१ मार्च रोजी शासकीय कार्यालयाकडून आॅनलाईन येणाऱ्या बिलांना मंजुरी देण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते़ (प्रतिनिधी)