शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

रस्ते पडू लागले अपुरे; देवळाई, आकाशवाणी आणि दूध डेअरी चौकांत होते वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 6:25 PM

दिवाळी खरेदीसाठी शहरवासीय घराबाहेर पडत असल्याने दिवसभरही  वाहतूक कोंडी होत आहे.

ठळक मुद्देशहरात मोठ्याप्रमाणात वाहने वाढताहेत अनेक वर्षांत वाहतुकीचे नियोजन नाही

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून वाहनचालकांना शहरातील प्रमुख चौकांत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जालना रोडवरील आकाशवाणी चौक, शासकीय दूध डेअरी आणि बायपासवरील देवळाई चौकात वाहनचालकांना अडकून पडावे लागत असल्याचा अनुभव रोज येत आहे.

दिवाळी खरेदीसाठी शहरवासीय घराबाहेर पडत असल्याने दिवसभरही  वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी, वाहनचालकांना आकाशवाणी चौकात आणि पुढे शासकीय दूध डेअरी चौकात दहा मिनिटांहून अधिक काळ वाहतूक कोंडीमुळे पुढे जाता येत नाही. देवळाई चौकात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जड वाहने सुसाट धावतात. वाहतूक सिग्नल सुरू असताना सिग्नल तोडून पळणारे पोलिसांना जुमानत नाहीत. परिणामी, हा चौक जीव मुठीत धरून ओलांडवा लागतो.

सेव्हन हिल : जालना रोडवरील आकाशवाणी चौक ते सेव्हन हिल अशी  गुरुवारी दुपारी वाहतूक जाम झाली. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वाहतूक ठप्प होत आहे. उपाय : रस्त्याच्या दुतर्फा अनेक वाहने आणि हातगाड्या उभ्या असतात. त्या हटविणे गरजेचे आहे.  इमारतींचे पार्किंग आहे की नाही, हे तपासायला हवे. 

दूध डेअरी चौक : जालना रोडवरील दूध डेअरी चौकात वाहतूक खोळंबल्याचे हे दृश्य रोजच पाहायला मिळते. अनेक वर्षांपासून या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. उपाय : या चौकांच्या चारही बाजूंनी डावीकडून जाण्याचे मार्ग आणखी प्रशस्त करावे लागतील. शिवाय वाहतूक पोलीस चौकाच्या मध्यभागी उभा असलेला हवा. 

देवळाई चौक : बीड बायपासवरील देवळाई चौकापासून रेल्वे स्टेशन रस्त्याकडे लागलेली वाहनांची लांबलचक रांग. देवळाई चौक सध्या सगळ्यात धोकादायक बनला आहे. उपाय : या ठिकाणी बीडकडून रेल्वेस्टेशनकडे उड्डाणपूल तयार करावा लागेल. अन्यथा वाहतुकीचा खोळंबा होतच राहणार. 

रात्री उशिरापर्यंत नियमन होते दिवाळीनिमित्त नागरिक बाजारात गर्दी करीत असल्याने वाहतूक मंदावते. कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस हाताने वाहतूक नियमन करतात. दूध डेअरी चौकातील रस्ता सायंकाळी ६ ते ८ कालावधीत एकेरी केला. यामुळे सायंकाळी तेथे कोंडी होत नाही. देवळाई चौकातही पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक नियमन करतात.- मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबाद