शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता एक, योजना अनेक!

By admin | Updated: July 22, 2014 00:14 IST

बीड : एकाच रस्त्यावर वेगवेगळ्या योजनांखाली लाखोंची उधळपट्टी केल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यात घडला आहे़ यासंदर्भात चौकशी करुन कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे़

बीड : एकाच रस्त्यावर वेगवेगळ्या योजनांखाली लाखोंची उधळपट्टी केल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यात घडला आहे़ यासंदर्भात चौकशी करुन कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे़ रस्ते कामांसाठी शासनाच्या भरमसाठ योजना आहेत़ मग्रारोहयो, सार्वजनिक बांधकाम, खासदार फंड, तेरावा वित्त आयोग, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन विकास निधी, झेडपीआरचा त्यात समावेश आहे़ यापैकी काही योजनांचा पैसा एक ते दोन वर्षांत एकाच रस्त्यावर खर्ची झाल्याचा आरोप भाजयुमोचे आष्टी तालुकाध्यक्ष रामभाऊ खाडे यांनी केला आहे़ आष्टी ग्रामीण रुग्णालय जोडरस्ता, आष्टी ते पिंप्री, पारगाव ते बळेवाडी, कऱ्हेवडगाव ते कऱ्हेवाडी, कडा ते बीड, टाकळसिंग ते सांगवी, आष्टा हरिनारायण ते आष्टी, कडा ते रुई नालकोल, पांढरी ते हंबर्डे वस्ती आदी रस्ते कामांवर विविध योजनांखाली लाखोंचा निधी उचलण्यात आला आहे़ एकाच रस्त्यावर वर्ष, किंवा दोन वर्षात लाखोंचा निधी कसा काय खर्च होतो असा सवाल खाडे यांनी उपस्थित केला आहे़ रस्ते कामांमध्ये अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे़माहिती अधिकाराला केराची टोपलीरामभाऊ खाडे यांनी रस्ते कामांच्या माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे ६ मे २०१४ रोजी महिती मागविली; पण त्यांना काही माहिती मिळालीच नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकउे तक्रार केली. त्यानंतर बांधकाम विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता एस. आर. शेंडे यांनी लेखी पत्र देऊन माहिती अधिकाराचा अर्जच मिळाला नाही, अशी सारवासारव केली. (प्रतिनिधी)न्यायालयात जाणारमाहिती अधिकाराचा अर्ज करुनही माहिती दडविली जात आहे. रस्ते कामात सारे अलबेल आहे तर माहिती देण्यास का टाळाटाळ केली जात आहे? असा सवाल रामभाऊ खाडे यांनी केला आहे. अनियमिततेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.