रस्ते बांधणीसाठी मनपाला सव्वा कोटी

By Admin | Updated: September 8, 2014 00:34 IST2014-09-08T00:16:33+5:302014-09-08T00:34:42+5:30

औरंगाबाद : राज्य सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकांना चालू आर्थिक वर्षासाठी रस्ते दुरुस्ती आणि रस्ते बांधणीसाठी सर्वसाधारण अनुदान मंजूर केले आहे.

Road to the construction of roads | रस्ते बांधणीसाठी मनपाला सव्वा कोटी

रस्ते बांधणीसाठी मनपाला सव्वा कोटी

औरंगाबाद : राज्य सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकांना चालू आर्थिक वर्षासाठी रस्ते दुरुस्ती आणि रस्ते बांधणीसाठी सर्वसाधारण अनुदान मंजूर केले आहे. औरंगाबाद मनपाला सव्वा कोटी आणि जिल्ह्यातील नगर परिषदांना ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या सातारा- देवळाई नगर परिषदेलाही पाच लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
नगर विकास विभागाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात राज्यातील मनपा आणि नगर परिषदांना रस्त्यांसाठी तीनशे पन्नास कोटी ९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
हा निधी मनपा आणि नगर परिषदांना वितरित करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यास १ कोटी ५४ लाख १७ हजार ९४८ रुपये इतका निधी मिळाला आहे.
यातील १ कोटी २४ लाख रुपयांचा निधी औरंगाबाद मनपाला मिळाला आहे, तसेच गंगापूर नगर परिषदेला २ लाख ९४ हजार, कन्नड नगर परिषदेला ४ लाख ३३ हजार, खुलताबाद नगर परिषदेला १ लाख ६७ हजार, पैठण नगर परिषदेला ४ लाख ४१ हजार, सिल्लोड नगर परिषदेला ६ लाख १८ हजार, वैजापूर नगर परिषदेला ४ लाख ३८ हजार आणि नव्याने स्थापन झालेल्या सातारा- देवळाई नगर परिषदेला ५ लाख ३७ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

Web Title: Road to the construction of roads