शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इसिसचा धोका संपूर्ण जगाला

By admin | Updated: February 17, 2016 00:47 IST

औरंगाबाद : जगातला कुठलाही देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त नाही. यात भारताचा क्रमांक कितवा, याला मी महत्त्व देत नाही;

औरंगाबाद : जगातला कुठलाही देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त नाही. यात भारताचा क्रमांक कितवा, याला मी महत्त्व देत नाही; परंतु या संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी आपला तरुण आपल्या ताब्यात कसा राहील, हे पाहिले पाहिजे. तो देशात राहण्यातच आपली प्रगती आहे, हे वाटायला लागणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुणांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचे काम महाराष्ट्र पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित रविवारपासून औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयाचा आणि मंगळवारी औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्राचा आढावा घेतला. शहर पोलीस व मराठवाड्यातील दोन्ही परिक्षेत्रांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांनी सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.इसिसबाबत विचारलेल्या प्रश्नावर महासंचालकांनी सुरुवातीला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना बोलण्यास सांगितले. आयुक्तांनी शहरातील तरुणांमध्ये जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत २७० शाळा, कॉलेजमध्ये जनजागृती झाल्याची माहिती दिली. त्यानंतर महासंचालकांना राज्याबाबत विचारले असता पोलिसांनी भिवंडी, मालेगाव, उस्मानाबाद, कोकण आणि औरंगाबाद इ. ठिकाणांसह राज्यात तरुणांची मने वळविण्यासाठी जनजागृती सुरू केल्याचे सांगितले. १०० नक्षलवादी पकडलेनक्षलवादाबाबत दीक्षित म्हणाले की, गडचिरोलीची सध्याची परिस्थिती राज्यात सर्वोत्तम आहे. पोलीस, विशेष कृती दल यांचे वर्षभरातील काम अतिशय चांगले आहे. ५० नक्षली ठार झाले आहेत. शंभरहून जास्त नक्षली पकडण्यात आले आहेत.