शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम मतदारसंघासाठी रिपाइंचा दावा

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

विकास राऊत , औरंगाबाद लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहता शिवसेना-भाजपा व रिपाइं या महायुतीला सध्या स्फुरण चढले आहे.

विकास राऊत , औरंगाबाद
लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहता शिवसेना-भाजपा व रिपाइं या महायुतीला सध्या स्फुरण चढले असून, विधानसभेत पश्चिम मतदारसंघाची जागा मिळावी यासाठी रिपाइं आठवले गटाने डावपेच आखण्यास तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ही महायुती अभेद्य राहिली तर रिपाइं त्या जागेसाठी नेटाने प्रयत्न करण्याच्या तयारीला लागली आहे.
शिवसेनेचे संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीकडून ती जागा रिपाइं (आ) गटासाठी सोडण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील, त्यावरच सर्व काही अवलंबून आहे. रिपाइं खा.रामदास आठवले यांनी मध्यंतरी ती जागा मागण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे वक्तव्य केले होते.
खा.चंद्रकांत खैरे आणि आ.शिरसाट यांच्यात मागील साडेचार वर्षांमध्ये विशेष असे सख्य राहिलेले नाही. जि. प. निवडणुका आणि विविध राजकीय कार्यक्रमांचा आढावा घेतला तर प्रत्येक व्यासपीठावरून दोघांमध्ये जुगलबंदी झालेली आहे. खा.खैरे यांचे चिरंजीव युवा सेनेचे जिल्हाधिकारी ऋषिकेश खैरे यांनादेखील त्या मतदारसंघातून निवडणूक मैदानात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेसकडून जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच गेल्या वेळचे पराभूत उमेदवार चंद्रभान पारखे यांनाही उमेदवारीची अपेक्षा आहे. तर रमानगरचे नगरसेवक मधुकर सावंत यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. काँगे्रसला त्या मतदारसंघामध्ये पुष्कळ काम करण्याची गरज असल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघातील मतांच्या आकड्यावरून दिसते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या त्या मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध काँग्रेस, अशी थेट लढत २००९ मध्ये झाली होती.
आ. शिरसाट हे १४ हजार २१३ मतांनी विजयी झाले होते. यावेळी बहुरंगी लढत होण्याचे संकेत इच्छुकांच्या यादीवरून दिसत आहे. मनसे यावेळी उमेदवार देणार की नाही, याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. महायुतीमध्ये जागा वाटपांवरून काही वाद झाला तर भाजपादेखील पश्चिममधून निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपानेदेखील स्वतंत्र तयारी केली आहे. परंतु भाजपाने अजून उमेदवाराची चाचपणी केलेली नाही.
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते
शिवसेनासंजय शिरसाट५८,००८
काँग्रेसचंद्रभान पारखे४३,७९७
अपक्षअमित भुईगळ ३७९१
इच्छुकांचे नाव पक्ष
आ. संजय शिरसाटशिवसेना
ऋषिकेश खैरेशिवसेना
जितेंद्र देहाडेकाँग्रेस
डॉ.पवन डोंगरेकाँग्रेस
अरविंद धीवरमनसे
मधुकर सावंतअपक्ष