शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

यकृत पुनरुज्जीवित करणे लाभदायक

By admin | Updated: December 28, 2015 00:27 IST

औरंगाबाद : विविध कारणांमुळे यकृत खराब झाल्यावर यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो; परंतु दात्याअभावी प्रत्यारोपण शक्य होत नाही.

औरंगाबाद : विविध कारणांमुळे यकृत खराब झाल्यावर यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो; परंतु दात्याअभावी प्रत्यारोपण शक्य होत नाही. अशा परिस्थितीवर रिजेनेटिव्ह थेरपीद्वारे काही प्रमाणात मात करून यकृतास पुनरुज्जीवित करता येत आहे. थेरपीद्वारे ५ टक्क्यांपर्यंत यकृत पुनरुज्जीवित होत असल्याने रुग्णाचे जीवन सुसह्य होते; परंतु तरीही ही थेरपी प्रत्यारोपणाची जागा घेऊ शकत नाही, असे दिल्ली येथील इन्स्टिट्यूट आॅफ लिव्हर अ‍ॅण्ड बिलिअरी सायन्सेसचे संचालक पद्मभूषण डॉ. शिव सरीन म्हणाले.‘मराठवाडा सोसायटी आॅफ गॅस्ट्रोएंटरॉलॉजी’तर्फे पचनविकार व यकृतविकारतज्ज्ञांच्या आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी आयोजित सत्रात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. रमेश सातारकर, डॉ. अनिरुद्ध गोपनपल्लीकर, डॉ. संदीप काळोखे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. शिव सरीन म्हणाले की, नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशा बोन मॉरो व यकृत अशा दोन बाजू आहेत. यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय नसल्यावर बोन मॅरोच्या मदतीने रिजेनेटिव्ह थेरपीद्वारे यकृत पुनरुज्जीवित केले जाते. देशभरात दरवर्षी २ लाख यकृताच्या प्रत्यारोपणाची आवश्यकता असते; परंतु प्रत्यक्षात अवघ्या २ हजार यकृतांचे प्रत्यारोपण होत आहे. प्रत्यारोपणाअभावी अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते.