शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचारी संपावर

By admin | Updated: August 2, 2014 01:43 IST

हिंगोली : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात हिंगोली जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले असून आज महसूल दिनाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला नाही.

हिंगोली : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात हिंगोली जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले असून आज महसूल दिनाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामांत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला नाही.महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. यावेळी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निश्चय संघटनेने केला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हिंगोली जिल्हा कचेरीसह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. औंढ्यातही महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)वसमतमध्येही सहभागवसमत : महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. वसमत येथील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे. वसमत येथील संपात महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नरहरी शिंदे, अशोक भोजने, चांदने, मिरमुटे, केजकर, अरब फारोखी यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)कळमनुरीत कामकाजावर परिणामकळमनुरी : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प झाले होते. या आंदोलनात के.एम. वीरकुंवर, व्ही.बी. सेवनकर, शिवाजी पोटे, सुरनर, सिद्धार्थ कोकरे, जया दुभळकर, वहीद पठाण, अनवर अली, विनोद अंभोरे, बी.एस. चव्हाण, मिलिंद वाकळे, प्रमोद खर्जूले, अल्का कोकरे, शिल्पा इंगोले, जाधव, पाटील, शेख अहमद, बंडू संगेकर, बलखंडे, व्यवहारे, जैस्वाल, डुकरे आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)सेनगावची तहसील कुलूपबंद सेनगाव : विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने शुक्रवारी सेनगाव तहसीलचे कामकाज पूर्णत: बंद होते. तर विविध विभाग दिवसभर कुलूपबंद होते. सेनगाव येथील २० महसूल कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे येथील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: बंद होते. तहसीलदारासह, नायब तहसीलदार या प्रमुख अधिकाऱ्यांसह सर्व विभाग दिवसभर कुलूपबंद होते.या आंदोलनाचा अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कार्यालयीन कामकाजानिमित्त आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्रही या आंदोलनामुळे बंद होते.