शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीची सोनसाखळी पळवणारा सराईत गुन्हेगार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:04 IST

औरंगाबाद : केटली गार्डन येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीची दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांपैकी ...

औरंगाबाद : केटली गार्डन येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीची दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांपैकी एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. दुसरा आरोपी फरार झाला आहे. तसेच या चोरट्यांकडून सोने विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यालाही अटक केली आहे.

सिडको भागातील एन-३ मधील केटली गार्डनपर्यंत शनिवारी (दि.२४) सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी कमल नामदेव जाधव यांच्या गळ्यातील सोनसाखळी दोन दुचाकीधारकांनी हिसकावून नेली होती. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविषयी गुन्हे शाखेच्या पथकाला बाळू भागाजी मकळे (रा. मुकुंदनगर) याने सोनसाखळी चोरली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने त्याच्या घराजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता, त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. हा गुन्हा शिवा पोपट कांबळे (रा. इंदिरानगर) याच्यासोबत केल्याचे सांगितले. गुन्हा करताना बाळू मकळे हा गाडी चालवत होता, तर शिवा कांबळे हा पाठीमागे बसलेला होता. शिवा याने महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी ओढली. ही सोनसाखळी चोरल्यानंतर दोघांनी त्याच दिवशी सोने व्यापारी विजय तनसुखलाल सोनी यांच्या टीव्ही सेंटर येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्समध्ये विक्री केल्याची कबुली पकडलेल्या आरोपींनी दिली. यातील शिवा कांबळे हा फरार आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज शिंदे, पोलीस कर्मचारी संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, राजेंद्र साळुंके, आनंद वाहुळ, विशाल पाटील, रितेश जाधव आणि चालक शिनगारे यांच्या पथकाने केली.

चौकट,

सोनसाखळीची लगड बनविली

सराईत चोरट्यांकडून व्यापारी विजय सोनी यांनी विकत घेतलेल्या सोनसाखळी त्याच दिवशी वितळून त्याची लगड बनविली होती. आरोपीला घेऊन पोलीस व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर सोनी याने बनविलेली लगड पोलिसांच्या ताब्यात दिली. यानंतर सोनी यासही पोलिसांनी ताब्यात घेत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हजर केले. यानंतर दोघांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तपास करीत आहेत.

चौकट,

औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत गुन्हे

सोनसाखळी चोरणारे बाळू भागाजी मकळे व शिवा कांबळे हे सराईत चोर आहेत. त्यांच्यावर जालना, औरंगाबाद जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांत १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.