शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची जबाबदारी पोलिसांच्या माथ्यावर

By admin | Updated: December 30, 2015 00:47 IST

औरंगाबाद : रस्त्यावर वाळू, विटा, खडी यासारखे बांधकाम साहित्य आणि कचरा टाकून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत,

औरंगाबाद : रस्त्यावर वाळू, विटा, खडी यासारखे बांधकाम साहित्य आणि कचरा टाकून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे पत्र महानगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध पोलीस ठाण्यांना दिले आहे.महानगरपालिकेने कॅरिबॅगच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. कॅरिबॅगचे मुख्य विक्रेते आणि व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्यासोबतच आता रस्त्यावर कचरा टाकून रस्ते घाण करणारे तसेच रस्त्यावर वाळू, खडी व बांधकाम साहित्य टाकणाऱ्या व्यक्तींविरुद्धही कारवाईचा निर्णय मनपाने घेतला आहे. अशा नागरिकांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे पत्रच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. शहरात रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौक ते पैठणगेट, रेल्वेस्टेशन ते घाटी हॉस्पिटल, छावणी ते विद्यापीठगेट ते हर्सूल टी-पॉइंट ते सिडको बसस्थानक, केम्ब्रिज शाळा ते महावीर चौक, सिडको बसस्थानक ते रोशनगेट, आझाद चौक, टी.व्ही. सेंटर ते एन-६, सेव्हन हिल ते गारखेडा शिवाजीनगर आदी प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यांवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, चहाचे कप, ओला, सुका कचरा, रेती, खडी रस्त्यावर टाकून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला जात आहे. नागरिक, व्यापारी, मांस विक्रेते रस्त्यावर कचरा टाकत आहेत. अशा व्यक्तींच्या विरोधात मुंबई पोलीस अ‍ॅक्ट व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.