शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

By admin | Updated: June 30, 2014 00:05 IST

हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंचच्या सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.

हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंचच्या सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. रविवारी दोन सत्रात झालेल्या शिबिरात महिला व बालकांच्या विविध आजारांची तपासणी व मार्गदर्शन करून औषधींचे वाटप करण्यात आले.
‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंच आणि माधव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅन्ड क्रिटीकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले. माधव हॉस्पिटल येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन शल्यचिकित्सक डॉ. सचिन बगडिया व स्त्रीरोग तज्ज्ञ
डॉ. कांचन बगडिया यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदकुमार करवा, डॉ. सुधीर भगत, डॉ. नंदिनी भगत, डॉ. अमित शहा,
डॉ. बी.एन. चव्हाण, डॉ. अर्चना सराफ, डॉ. दिनेश मुंदडा, डॉ. नागेश बांगर, डॉ. विशाल पवार, डॉ. राजेश धमणे, डॉ.सोनाली दमकोंडवार,
डॉ. सुमंत नायक, डॉ. सारंग पाठक,
डॉ. पूजा पाठक, डॉ. शिल्पा देशमुख, राजीव राठोड आदी उपस्थित होते.
शिबिरात सखीमंच आणि बालविकास मंच सदस्यांच्या आरोग्याची तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात आली. प्रामुख्याने मुळव्याध, अ‍ॅसिडीटी, मासिक पाळी, श्वेतपदर आदी आजारांची तपासणी करून महिलांना सल्लाही देण्यात आला. शिबिरात गर्भवती महिलांना मार्गदर्शन करून औषधींचे वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात बालकांमधील हार्निया, हायड्रोक्सील, हायपोस्पाडीयाझ, दुभंगलेले ओठ, अस्थिरोगांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, बालक आणि महिलांचे दात, कान, नाक, घशाच्या आजारांची तपासणी तज्ज्ञांनी केली. उपस्थित मान्यवर तसेच तज्ज्ञांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सूत्रसंचालन अर्चना जाधव यांनी केले. माधव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅन्ड क्रिटीकल केअर सेंटरने कार्यक्रमाचे प्रायोजक स्वीकारले होते. (वाणिज्य प्रतिनिधी)