आगाऊ पैसे भरूनही पाण्याचा ठणठणाट...

By Admin | Updated: September 21, 2014 00:43 IST2014-09-21T00:02:19+5:302014-09-21T00:43:05+5:30

औरंगाबाद : आठशे रुपये देऊनही पाणी आठ दिवसांत एकदाच मिळत असल्याने बाराही महिने ठणठणाट आहे

Resolve the water by paying in advance ... | आगाऊ पैसे भरूनही पाण्याचा ठणठणाट...

आगाऊ पैसे भरूनही पाण्याचा ठणठणाट...

औरंगाबाद : गुंठेवारीचा विषय पुढे करून मनपाने टँकरच्या पाण्याच्या आगाऊ पैशात वाढ करून एक ड्रम पाण्यासाठी आठशे रुपये देऊनही पाणी आठ दिवसांत एकदाच मिळत असल्याने पाण्यासाठी पावसाळ्यातच नव्हे, बाराही महिने ठणठणाट आहे. टँकर येणार म्हणून कामगार कुटुंबियांतील किमान एकाला तरी कामाला दांडी मारून घरीच थांबावे लागत असल्याने दुहेरी नुकसानीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
जलकुंभ जवळ असूनही परिसरात पाणीटंचाईचे सावट कायम आहे, एकीकडे काही जनतेला मुबलक पाणीपुरवठा तर अर्ध्या जनतेला पाण्यासाठी हंडा घेऊन भटकंती करावी लागत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, सांडपाण्याची विल्हेवाट नाही, मोकळ्या प्लॉटवर पाण्याचे तळे तुंबले असून, त्यावर डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. औषध व धूर फवारणीसाठी चुकूनही अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नसल्याने डेंग्यूचा फैलाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाण्याचा निचरा करावा, अशी मागणी सिद्धार्थ वडमारे, नारायण पारटकर, इम्रान खान, मंदाबाई जाधव, नीराबाई राठोड, परमेश्वर पट्टेकर, बळीराम जाधव, सुनील लांडगे, डॉ. पैठणे, शीलाबाई खंडारे, सुनील मनोहर आदी नागरिकांतून जोर धरीत आहे.

Web Title: Resolve the water by paying in advance ...