मुलांच्या जडणघडणीसंदर्भातील शंकांचे निरसन

By Admin | Updated: March 1, 2015 00:08 IST2015-03-01T00:01:24+5:302015-03-01T00:08:53+5:30

औरंगाबाद : लहान मुलांच्या जडणघडणीसंदर्भात असणाऱ्या अनेक शंका आणि समज याची उत्तरे शनिवारी अनेक पालकांना मिळाली. मुंबईच्या मनोचिकित्सक व समुपदेशक फातिमा राशीद

Resolve the Conclusions related to Children's Compensation | मुलांच्या जडणघडणीसंदर्भातील शंकांचे निरसन

मुलांच्या जडणघडणीसंदर्भातील शंकांचे निरसन


औरंगाबाद : लहान मुलांच्या जडणघडणीसंदर्भात असणाऱ्या अनेक शंका आणि समज याची उत्तरे शनिवारी अनेक पालकांना मिळाली. मुंबईच्या मनोचिकित्सक व समुपदेशक फातिमा राशीद यांनी पालकांना पाल्यांच्या वागण्यासंदर्भात पडणाऱ्या प्रश्नांची योग्य आणि समाधानकारक उत्तरे एका सादरीकरणाद्वारे दिली.
‘लोकमत’ आणि ‘युनिव्हर्सल हायस्कूल’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशस्वी पालकत्व परिसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फातिमा राशीद बोलत होत्या.
यावेळी काही महिलांनी ‘माझा मुलगा माझे ऐकतच नाही,’ ‘त्याने माझे ऐकावे यासाठी मी काय करू,’ असे प्रश्न फातिमा यांना विचारले असता त्यांनी छोटी छोटी उदाहरणे देऊन मुलांना छोट्या छोट्या शिक्षा देण्याचा सल्ला दिला.
मुलांना शिस्त लावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. माझा मुलगा, मुलगी संगणक व मोबाईल फोनला सतत चिकटलेला असतो? मला माझ्या पाल्यांच्या संरक्षण तसेच अभ्यासाबद्दल खूप काळजी वाटते, असे अनेक प्रश्न यावेळी पालकांनी विचारले. फातिमा यांनी सादरीकरणाद्वारे उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
वाचन, लेखन या कौशल्यांचा अभ्यासक्रमात समावेश करणे आवश्यक आहे़ म्हणूनच एकविसाव्या शतकातील मुलांची जडणघडण करताना पालक व शिक्षकांना वेळोवेळी उपयुक्त व आवश्यक अशा वृत्ती व कौशल्यांमध्ये पारंगत करणे गरजेचे आहे, यावर युनिव्हर्सल हायस्कूलचा ठाम विश्वास
आहे़
युनिव्हर्सल हायस्कूल ही प्रतिष्ठित युनिव्हर्सल एज्युकेशन या समूहाचा भाग आहे़ सदर संस्थेचा विस्तार मुंबई, बंगळुरू, नाशिक, शारजाह आणि दुबई येथे झालेला आहे़

Web Title: Resolve the Conclusions related to Children's Compensation