शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभानू सोनवणेंच्या साहित्य, अध्यापनावर संशोधन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:15 IST

लातूर : साहित्य अध्यापनाचे अवघड कार्य चंद्रभानू सोनवणे यांनी समर्थपणे पेलले आहे़ त्यांच्या साहित्य अध्यापनावर सोनवणे शैक्षणिक संकुलातूनच संशोधन व्हावे,

लातूर : साहित्य अध्यापनाचे अवघड कार्य चंद्रभानू सोनवणे यांनी समर्थपणे पेलले आहे़ त्यांच्या साहित्य अध्यापनावर सोनवणे शैक्षणिक संकुलातूनच संशोधन व्हावे, असे मत साहित्यिक तथा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ़ नागनाथ कोथापल्ले यांनी येथे रविवारी व्यक्त केले़ चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयात चंद्रभानू सोनवणे गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले़ यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी खा़डॉ़ जनार्दन वाघमारे होते़ यावेळी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ़ इरेश स्वामी, प्राचार्य डॉ़ बलभीम गोरे, चंद्रभानू सोनवणे यांच्या पत्नी मीरा सोनवणे, संजीव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ कोथापल्ले म्हणाले, लातूर व सोनवणे महाविद्यालयातून डॉक्टर, अभियंते घडले आहेत़ आपण संशोधनात अद्यापही मागे आहोत़ सोनवणे संकुलातून नवनिर्मिती करणारे संशोधक घडावेत़ चंद्रभानू सोनवणे यांनी साहित्य व अध्यापनात भरीव कार्य केले आहे़ सध्या त्यांचे पुत्र संजीव सोनवणे यांनी आपल्या वडिलांची परंपरा पुढे नेऊन पित्रऋण फेडले आहे़ इरेश स्वामी म्हणाले, सोनवणे गौरव ग्रंथ हा गुरूप्रती व्यक्त झालेली शिष्याची भावना आहे़ प्रास्ताविक डॉ़बलभीम गोरे यांनी केले़ आभार डॉ़ सतिश यादव यांनी मानले़