शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांना हात जोडून विनंती, छत्रपती संभाजीनगरातील अनधिकृत बॅनर काढा : महापौर समीर राजूरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:46 IST

आता तुला 'जीबी'मध्ये पाहून घेतो, अशा धमक्या सुरू झाल्यात - आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर : अनधिकृत बॅनरबाजीमुळे क्रांतीचौकासह संपूर्ण शहर विद्रूप झाले आहे. माझी मनपा आयुक्तांना हात जोडून विनंती आहे, हे सर्व बॅनर काढा. बॅनरमुक्त शहर तयार करून आपण एक आदर्श निर्माण करू, अशी आर्त हाक नवनियुक्त महापौर समीर राजुरकर यांनी मनपा, पोलिस प्रशासनाला दिली. त्याच्या प्रत्युत्तरात मात्र मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी 'माझे अधिकारी, कर्मचारी बॅनर काढायला गेल्यावर कोणा कोणाचे काॅल येतात, हे येथे सांगू शकत नाही. आता तर 'तुला जीबीमध्ये पाहून घेतो, अशा धमक्याही यायल्या लागल्यात' असे सांगत खुद्द आयुक्तांनीच अनधिकृत बॅनरबाजीबाबत अप्रत्यक्ष हतबलता व्यक्त केली.

सर्वत्र १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. जयंतीनिमित्त शहरात मोठ्या उत्साहात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सोमवारी तापडिया नाट्यगृहात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत नागरिकांनी शहरातील नशेखोरी, अस्वच्छ रस्ते, कचरा, उत्सव मिरवणूक मार्गावर वाहणाऱ्या खराब पाण्यावरून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

महापौर समीर राजुरकर, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पृथ्वीराज पवार, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, नगरसेवक अनिल मकरिये, बबन डिडोरे पाटील, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, तहसीलदार उमेश पाटील, ज्योतिराम पाटील यांची उपस्थिती होती.

दिसला खांब की लाव बॅनर, ही वृत्ती बळावली
व्यस्त वेळापत्रकामुळे काही वेळेसाठीच आलेल्या महापौर समीर राजुरकर यांनी पाच मिनिटांच्या भाषणात आदर्श शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. यापुढे अनाठायी खर्च करण्याऐवजी महाराजांचे अर्थशास्त्र, युद्धनीती, राजनीती, शेतीविषयी धोरणांबाबत तज्ज्ञांचे व्याख्यानसत्र ठेवावे. यामुळे नव्या पिढीसमोर आदर्श उभा राहील, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी शहरातील अनधिकृत बॅनरबाजीबाबत खंत व्यक्त केली. क्रांती चौकासह ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जाते. एक शिवप्रेमी म्हणून मी मनपा आयुक्तांना हे बॅनर काढण्यासाठी विनंती करतो, अशी हाक त्यांनी दिली. त्याला उत्तर देताना जी. श्रीकांत म्हणाले की, मी अनधिकृत बॅनरवर कारवाई कधीही करू शकतो. मात्र, शहरात खांब दिसला की लाव बॅनर ही वृत्ती वाढली आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकही खांब रिकामा सोडला नाही. त्यावर कारवाई करायला गेले की कोणा कोणाचे काॅल येतात, हे येथे सांगू शकत नाही. आता तर तुला जीबीमध्ये पाहून घेतो, अशा धमक्याही यायल्या लागल्यात' असा खुलासाही त्यांनी केला.

मी आयएएस तरीही मुलींना क्रांती चौकात नेण्याची हिंमत झाली नाही
क्रांती चौकातील मिरवणूक उत्सव व गर्दीवरूनही अनेकांनी सूचना केल्या. क्रांती चौकातील शिवजन्मोत्सव पाहायला कुटुंब एकत्र येते. त्यामुळे क्रांती चौकात महिला, तरुणींसाठी बॅरिकेटिंग करून स्वतंत्र भाग तयार करण्याची मागणी बैठकीला महिलांनी केली. तर जी. श्रीकांत यांनी क्रांती चौकात डीजेमुक्त जयंती साजरी करण्याचे आवाहन करताना स्वानुभव सांगितला. डीजे लावला की काही हुल्लडबाज तरुण मिरवणुकीत सहभागी होतात. गतवर्षी मी माझ्या एका मुलीला माँ जिजाऊ, तर दुसऱ्या मुलीला शिवाजी महाराजांची वेशभूषा केली हाेती. त्यांना क्रांती चौकात जायचे होते. मात्र, आयएएस असूनही क्रांती चौकातील गदारोळामुळे माझ्या मुलींना घेऊन जाण्याची हिंमत झाली नाही. यंदाची शिवजयंती उत्साहात मात्र डीजेमुक्त, कुटुंबांना सहभागी होता येईल, अशी सुरक्षित साजरी करा, स्वयंसेवकांनी त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शहर खड्डेमुक्त केल्याचा आयुक्तांचा दावा
बैठकीत एकही प्रश्न खड्ड्यांबाबत आला नाही, याबाबत जी. श्रीकांत यांनी समाधान व्यक्त करत शहर खड्डेमुक्त केल्याचा दावा केला. मनपाने तासाभरात खड्डे बुजवण्याचे मशीन आणले आहे. शिवजयंती मिरवणूक मार्गावरील प्रत्येक खड्डा बुजवला जाईल. जो रस्ता अन्य विभागांकडे आहे, तेही खड्डे बुजवा, अशी सूचना श्रीकांत यांनी बैठकीतच शहर अभियंत्यांना केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Remove Illegal Banners: Mayor's Plea, Commissioner Expresses Helplessness in Aurangabad

Web Summary : Mayor Rajurkar urged removal of illegal banners defacing Aurangabad. Commissioner Srikanth cited threats hindering action. Shivaji Maharaj Jayanti preparations discussed amidst concerns over public safety and cleanliness. The Commissioner also claimed Aurangabad is pothole-free.
टॅग्स :Shivaji Kardileyशिवाजीराव कर्डिलेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर