शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

नित्यनेमाने त्रिकाल पूजा

By admin | Updated: July 28, 2014 01:01 IST

हिंगोली : शहरातील जलेश्वर शिवमंदिराचा पूर्वेतिहास प्राचीनतम असल्याने श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीने हे मंदिर फुलणार आहे.

हिंगोली : शहरातील जलेश्वर शिवमंदिराचा पूर्वेतिहास प्राचीनतम असल्याने श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीने हे मंदिर फुलणार आहे. शहरात एकमेव शिवमंदिर असल्याने येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता संस्थानने धार्मिक कार्यक्रमांपासून पोलिसांच्या सुरक्षेपर्यंतचे नियोजन केले आहे. दंतकथेच्या पार्श्वभूमीमुळे हिंगोलीवासियांची पूर्वापार श्रद्धा या मंदिराशी जोडली गेल्याने वर्षभर भाविकांची रेलचेल असते. मंदिरातर्फे चातुर्मासाची सुरूवात श्रावणात होते. नंतर भाद्रपद, आश्विन, कार्तिक महिन्यापर्यंत सण, व्रत-वैकल्याचा महिना असल्याने हे कार्यक्रम पार पडतात. श्रावणातील प्रत्येक दिवशी मंदिरातील पांडवकालीन वालुकामय पिंडीची त्रिकाल पूजा केली जाते. मागील अनेक वर्षांपासून आजतागायत ही परंपरा कायम आहे. यंदाही सकाळ, दुपार आणि संध्याकाळी श्रींच्या मूर्तीची पूजा करण्यात येणार आहे. प्रत्येक सोमवारी रात्री भजन, मध्यरात्री फराळाचा महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी मंदिरापासून पालखी निघणार आहे. ती सराफा बाजार, कपडा गल्ली, मेडिकल लाईनमार्गे कयाधूकाठी पोहोचेल. तिथे महादेव आणि नागाच्या मुकुटाची पूजा करून आल्यामार्गे जलेश्वर मंदिरात परतून ही पालखी मिरवणूक विसर्जित केली जाईल. दरम्यान, कै. महंत नारायण पुरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तही विविध कार्यक्रम होणार असल्याचे मंदिराचे महंत सुभाष महाराज पुरी यांनी सांगितले. चारही श्रावण सोमवारी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्ताची मागणी केलेली आहे. कारण वैकुंठ कार्तिकी चतुर्दशी, महाशिवरात्री, नागपंचमी आणि श्रावण महिन्यात भाविकांची दिवसभर रीघ असते. दिवसेंदिवस भाविकांचा वाढता ओढा पाहता यंदा संस्थानने श्रावणाची जय्यत तयारी केली आहे. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी प्रयत्न होत आहेत. परिसरात स्वच्छताही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)