शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ची नोंदणी पुन्हा होणार सुरू !

By admin | Updated: November 19, 2014 00:58 IST

उस्मानाबाद : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी आधार कार्ड नोंदणीची सोय केली होती.

उस्मानाबाद : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी आधार कार्ड नोंदणीची सोय केली होती.तेव्हा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १२ लाख १८ हजार ७२३ जणांनी आधार कार्डची नोंदणी केली होती. असे असले तरी आणखी ४ लाख ३८ हजार ८५३ नागरिकांकडे आधार कार्ड नसल्याने ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. बँकेमध्ये खाते उघडायचे असो अथवा शासकीय सवलतींचा लाभ घ्यायचा असो. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून आधार कार्ड नोंदणी करण्यात येत आहे. प्रारंभी या नोंदणीस शहरी व ग्रामीण भागातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, गॅस सिलेंडर, रॉकेल अनुदान आदी बाबींसाठी आधारकार्डची गरज भासू लागल्यानंतर योजनेला खऱ्याअर्थाने गती आली. नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात ४ लाख ६० हजार ६९ तर दुसऱ्या टप्प्यात ७ लाख ५८ हजार ६५४ जणांनी नोंदणी केली. सध्या जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून आधार कार्ड नोंदणी बंद करण्यात आली होती. आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून १२ लाख १८ हजार ७२३ जणांनी आधार कार्डची नोंदणी केली आहे. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ८५३ जणांची नोंदणी होणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच जिल्ह्यातील आठ तालुक्यात मिळून ३३ ठिकाणी आधार नोंदणी केंद्र पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. याबाबत त्या-त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडून नियोजन करण्यात येत असून लवकरच आधार कार्ड नोंदणी सुरु करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितली. (प्रतिनिधी)