शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

७ टक्क्यांनी वाढले रेडीरेकनरचे दर

By admin | Updated: April 4, 2016 00:18 IST

परभणी : राज्य शासनाने १ एप्रिल रोजी रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ केली आहे़ परभणी जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ७ टक्क्यांनी हे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदी काहीशी महाग झाली

परभणी : राज्य शासनाने १ एप्रिल रोजी रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ केली आहे़ परभणी जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ७ टक्क्यांनी हे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदी काहीशी महाग झाली असली तरी बांधकाम दरात कपात केल्याचा दिलासाही मिळाला आहे़ जिल्ह्यात हे दर लागू झाले असून, नव्या दरानेच आता व्यवहार सुरू झाले आहेत़ जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करताना रजिस्ट्री कार्यालयातून रितसर नोंदणी करावी लागते़ शासनाने गावनिहाय जमिनीचे दर निश्चित केलेले असतात़ या दरानुसार रजिस्ट्री कार्यालयामध्ये मुद्रांक शुल्क भरून सदर जागा खरेदी केली जाते़ वाढती महागाई लक्षात घेऊन दरवर्षी रेडीरेकनरच्या दरातही वाढ केली जाते़ परंतु, यावर्षी राज्यभरात दुष्काळी परिस्थिती असल्याने रेडीरेकनरचे दर स्थिर राहतील, असे अपेक्षित होते़ मात्र राज्य शासनाने यावर्षीही साधारणत: ७ टक्क्यांपर्यंत रेडीरेकनरच्या दरात वाढ केली आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम झाला आहे़ अशा परिस्थितीत शेती अथवा घर बांधकामासाठी जमीन खरेदी करताना आता शासनाला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये रेडीरेकनरचे दर वाढल्याने आणखी एक संकट नागरिकांवर येऊन ठेपले आहे़ शासनाने रेडीरेकनरच्या दरात वाढ केली असली तरी बांधकामांच्या दरामध्ये मात्र बऱ्यापैकी कपात केली आहे़ त्यामुळे खुली जागा घेण्यापेक्षा ज्या जागेवर बांधकाम झाले आहे, अशी जागा विकत घेणे सोयीचे ठरणार आहे़ १ एप्रिलपासून जिल्ह्यात हे दर लागू झाले आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली़