शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२५ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST

गजेंद्र देशमुख, जालना जालना: महावितरणने औरंगाबाद व जालना जिल्ह्यात दोन महिन्यांत १२४९ वीज चोरांवर कारवाई करुन त्यांच्याकडून २५.१५ लाख रुपयांचा दंड वसूल केला.

गजेंद्र देशमुख, जालनाजालना: महावितरणने औरंगाबाद व जालना जिल्ह्यात दोन महिन्यांत १२४९ वीज चोरांवर कारवाई करुन त्यांच्याकडून २५.१५ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर ७२५ वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद व जालना जिल्ह्यांचा समावेश आहे. दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याच्या तक्रारी महावितरणकडे प्राप्त झाल्या होत्या. भारतीय विद्युत कायदा २००३ कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे त्याचबरोबर कलम १३५ मध्ये मीटरमध्ये फेरफार करणे, आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणने धडक कारवाई केली. औरंगाबाद परिमंडळात एप्रिल व मे महिन्यात वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. यात ६६४ वीजचोरी करणाऱ्यांना पकडण्यात आले. या वीजचोरांवर २७ लाख ७ हजार बिलाची आकारणी करुन २० लाख ९८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यातील ३०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात मोहीम राबवून ५८५ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. ३५.४१ रुपयांचा वीज बिलाची आकारणी करुन ४.१७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ४२० वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली. याविषयी मुख्य अभियंता शिंदे म्हणाले, ग्राहकांनी वीजमीटरमध्ये छेडछाड करु नये, आकडे टाकून अनधिकृत वीज जोडणी न घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आकडे टाकून वीजचोरीजालना शहरातील अनेक भागात आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीज गळतीसोबतच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील वीज चोरांवर कडक कारवाई करण्याचा येत आहे. थकबाकीदारांनी तात्काळ थकबाकी भरण्याचे आवाहन जालना महावितरणचे उप कार्यकारी अभियंता व्ही.आर.ढाकणे यांनी केले. जालना शहरातील नविन व जुना भागात मिळून लाखो रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा ढाकणे यांनी दिला.