शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सफाईचे पुन्हा खाजगीकरण

By admin | Updated: December 2, 2014 01:10 IST

औरंगाबाद : महापालिकेने पुन्हा रॅमकीच्या धर्तीवरच कचरासंकलन, साफसफाईचे कंत्राट देऊन खाजगीकरण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.


औरंगाबाद : महापालिकेने पुन्हा रॅमकीच्या धर्तीवरच कचरासंकलन, साफसफाईचे कंत्राट देऊन खाजगीकरण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. साफसफाईच्या खाजगीकरणात कोट्यवधी रुपयांनी हात पोळलेले असताना पालिका आता पुन्हा त्याच दिशेने प्रस्ताव तयार करून येत्या १५ दिवसांत निविदेचा मसुदा तयार करणार आहे. त्यासाठी समितीचे गठण करण्यात आले असून, येत्या आर्थिक वर्षापासून कचरा संकलनाचा खाजगी पॅटर्न पुन्हा औरंगाबादकरांच्या नशिबी येण्याची शक्यता आहे.
कंत्राटावरून रॅमकी इन्व्हायरो लि., हैदराबाद आणि मनपा यांच्यात आर्थिक वादातून लवाद नेमण्यात आला आहे. त्या लवादाच्या निकालावर अजून काही निर्णय झालेला नाही. शहरातून दिवसाकाठी ४५० ते ५०० मेट्रिक टन कचरा उत्सर्जित होतो. हा कचरा ९९ वॉर्डांसह सातारा व चिकलठाणा औद्योगिक परिसरातून उत्सर्जित होतो. नारेगाव येथील कचरा डेपोत तो कचरा ७० वाहनांच्या साहाय्याने टाकण्यात येतो. यावर पालिका दरवर्षी ४० कोटी रुपये खर्च करीत आहे.
मनपाचे शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी सांगितले की, निविदा तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये शहर अभियंता, मुख्य लेखाधिकारी, घनकचरा विभागप्रमुखांचा समावेश आहे. १५ दिवसांत निविदेचा मसुदा तयार होईल. त्यानंतर निविदा प्रसिद्धीसाठी देण्यात येईल. एप्रिलच्या बजेटमध्ये हे काम समाविष्ट केले जाईल.
रॅमकीच्या निविदेत मनपाचे कर्मचारी वर्ग करण्याचा उल्लेख नव्हता. त्या संस्थेने काम सुरू केल्यानंतर मनपाचे कर्मचारी वर्ग करण्यात आले. त्यामुळे अडचणी आल्या. यावेळी जी निविदा तयार करण्यात येईल, त्यात मनपाचे कर्मचारी वर्ग करून घेण्याची अट टाकण्यात येईल. वेतन, भत्ते व इतर मुद्यांचा त्यात समावेश असेल. संस्थेने स्वत:च्या वाहनाने घराघरांतील ओला व सुका कचरा संकलित करून कचरा डेपोपर्यंत नेण्याचे ते कंत्राट असेल.

महापालिका कचरा संकलनात पूर्णपणे अपयशी ठरत असून, कचरा संकलित करून नारेगाव डेपोपर्यंत नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांत कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण होत असल्याची शक्यता बळावली आहे. मनपा आणि खाजगी वाहनांच्या किती फे ऱ्या होतात. याबाबत काहीही नोंद यांत्रिकी विभागाकडे नसल्याची माहिती समोर आली आहे.
वर्षाला १२ कोटी रुपयांचा खर्च खाजगी रिक्षा, ट्रॅक्टर, टिप्परच्या फेऱ्यांवर, तर पालिकेच्या टिप्पर दुरुस्तीवर १ कोटींहून अधिक खर्च होऊनही शहरात कचऱ्यांचे ढीग कायम आहेत.
अनेक सफाई कर्मचारी बदली म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे साफसफाई सुरळीत होत नाही. परिणामी, खाजगीकरण करून या सर्व प्रश्नांची उकल होईल व शहर स्वच्छ होईल, असे प्रशासनाला वाटत आहे.