युवतीवर वर्षापासून बलात्कार

By Admin | Updated: August 23, 2015 00:02 IST2015-08-22T23:37:18+5:302015-08-23T00:02:09+5:30

सिरसाळा : वडील व भावाला ट्रकने उडवून देईल, अशी टोकाची धमकी देत एका नराधमाने युवतीवर वर्षभर बलात्कार केला. पीडित युवती सहा महिन्यांची गर्भवती आहे.

Rape since year | युवतीवर वर्षापासून बलात्कार

युवतीवर वर्षापासून बलात्कार


सिरसाळा : वडील व भावाला ट्रकने उडवून देईल, अशी टोकाची धमकी देत एका नराधमाने युवतीवर वर्षभर बलात्कार केला. पीडित युवती सहा महिन्यांची गर्भवती आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी सिरसाळा (ता. परळी) येथे उघडकीस आली.
सचिन तुळशीराम काळे (रा. सिरसाळा) असे आरोपीचे नाव आहे. पीडित युवती अल्पवयीन असून तिचे वय १७ आहे. ते दोघे शेजारी राहतात. आॅगस्ट २०१४ मध्ये सचिनने तुला तुझ्या आईने आमच्या घरी बोलावले आहे, असा निरोप देत तिला घरात घेतले. तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तो विवाहित आहे. पीडित युवतीचे आई-वडील मोलमजूरी करतात. ही बाब कोणाला सांगितली तर तुझ्या भावाला व वडिलास ट्रकने उडवून देईल, अशा धमक्या देत त्याने वर्षभर अत्याचार केला. त्याच्यापासून तिला दिवस गेले. घरच्यांनी विचारपूस केल्यावर तिने खरा प्रकार सांगितला. शनिवारी सायंकाळी पीडित युवतीने नातेवाईकांसह ठाणे गाठले. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला. पोलिसांनी नराधम सचिन काळे याला जेरबंद केले. त्याची सखोल चौकशी ुसुरू असल्याचेनिरीक्षक छबूराव सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान, पीडित युवतीला वैद्यकीय तपासणीसाठी स्वाराती रूग्णालयात पाठविण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Rape since year