धारूर : अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची घटना जहाँगीरमोहा येथे शनिवारी उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.जहाँगीरमोहा येथील १५ वर्षीय मुलगी २५ जुलै रोजी शाळेत जाण्यासाठी निघाली. गावातीलच नवनाथ बंकटी कांदे याने तिला वाटेत अडविले. कुकर्म करून त्याने धमक्या दिल्या. भीतीपोटी ती धुनकवड येथे मामाकडे गेली होती. नराधम कांदे तेथेही पोहोचला. त्यामुळे तिने नातेवाईकांसह ठाणे गाठले. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}