शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रमो रमा रे होळी,रो त्योहार होळी रमलो र ...

By admin | Updated: March 23, 2016 01:02 IST

मंठा : बंजारा समाज आणि होळीचा सण यांचे अतूट नाते आहे. क ालानुरु प सण साजरा क रण्याची पध्दती बदलत असली तरी बंजारा समाजाने होळी सणाची आपली

मंठा : बंजारा समाज आणि होळीचा सण यांचे अतूट नाते आहे. क ालानुरु प सण साजरा क रण्याची पध्दती बदलत असली तरी बंजारा समाजाने होळी सणाची आपली पारंपरिक पध्दती अजूनही जोपासली आहे. विशेष म्हणजे मंठा तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी होळी व धुळवडीच्या सणासाठी बंजारा तांड्यावर धूम सुरु आहे. या तालुक्यात बंजारा तांडे व समाज मोठ्या संख्येने आहेत. हा समाज होळी सणाला अत्यंत महत्व देतो. होळीच्या सणासाठी एक आठवड्यापासून तयारी सुरु होते. म्हणून तो आपल्या लेंगीतून म्हणतो, ‘रमो रमा रे होळी,रो त्योहार होळी रमलो र ...’ अशा दररोज लेहंगी गीते गायली जातात. प्रत्येक तांड्यावर जगदंबा देवीचे मंदिर असते. या मंदिरासमोर पारंपरिक लेहंगी गीते गायली जातात. लाठ्या- काठ्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. त्यानंतर पुन्हा तांड्याचा प्रमुख असणाऱ्या नायकाच्या घरासमोरही लेहंगी गीते व लाठ्या- काठ्यांचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला बंजारा तांड्यातील स्त्री-पुरूष, आबालवृध्द, लहान-मोठे, गरीब- श्रीमंत असे एक त्र होऊ न मोठ्या उत्साहात होळी सण साजरा क रतात. एक मेक ांच्या अंगावर मनसोक्त रंग उडवून बंजारा बोली भाषेतील खास धुडवडीची गीते गायली जातात. मद्य हे पेयपदार्थ व जेवणाला मटणाचाच प्रामुख्याने बेत ठरविला जातो. सामूहिक व पारंपरिक पध्दतीने आजही ही होळी साजरी के ली जाते. अलिकडच्या काळात शहरात वास्तव्यास असलेल्या बंजारा बांधवांमध्ये सामूहिक व पारंपरिक पध्दतीने होळी क रण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी तांड्यावर राहणाऱ्या समाज बांधवांनी मात्र परंपरा अजूनही जोपासली आहे. ही होळी म्हणजे एक सांस्कृतिक पर्वणीच आहे. होळी निमित्ताने गायल्या जाणाऱ्या लेहंगी गीताची सुरूवात... पहिलो समरण करलो गणपती रे, पहिलो समरण करलो सेवालाल महाराज रे ...या नमन गीताने केली जाते. सुख-दु:ख सेमछ, सुखेन क ोई साथ दिया, दुखेन क ोई साथ देईनी, अशी आशयपूर्ण गीतांची उधळणही होते. राम राम नाम भजेनी कोई, पाप व्हेगे पुण्य करेनी कोई, पापेरी वासना भुलाई कोणी, राम राम नाम भजेनी कोई ... अशा भक्ती गीतातून संदेश दिला जातो. मात्र होळीच्या निमित्ताने आपल्या नवऱ्याला गीतांच्या माध्यमातून आडव्या हाताने घेण्याची खास पध्दतही बंजारा समाजातील महिलांमध्ये आहे. होळी सणासाठी बंजारा तांडे सज्ज झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)