शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रामतीर्थ पोलिसांचा हलगर्जीपणा; वधूपित्याचा हकनाक बळी

By admin | Updated: April 26, 2016 23:48 IST

शंकरनगर : हिप्परगामाळ येथे २३ एप्रिल रोजी रॉकेल टँकर - ट्रकच्या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला़

शंकरनगर : हिप्परगामाळ येथे २३ एप्रिल रोजी रॉकेल टँकर - ट्रकच्या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला़ रामतीर्थ पोलिसांनी ट्रक हटविला़ पण टँकर रस्त्याच्या मध्यापर्यंत आडवे पडून राहिले़ अंधारातील टँकरला धडक बसल्यामुळे शेख बाबुमियाँ (रा़धानोरा, ता़नायगाव, ह़मु़ आदिलाबाद) हा वधूपिता जागीच ठार झाला़ यात रामतीर्थ पोलिसांवर अक्षम्य दुर्लक्षपणाचा आरोप होत आहे. देगलूरचे रॉकेल टँकर व नांदेडकडे जाणारा मालवाहू ट्रक यांच्यातील अपघातात टँकरखाली गेल्यामुळे टँकरचालक फकीरा निगारे (रा़हिंगोली) हे जागीच ठार झाले होते़ यानंतर पोलिसांनी या अपघातातील ट्रक नेवून रामतीर्थ ठाण्यात लावला़ हिप्परगा येथे घडलेल्या ट्रक-टँकर अपघातानंतर टँकरचे तोंड पश्चिमेला झाले आणि टँकर रस्त्याच्या मधोमध आडवे आले़ अपघातानंतर टँकरला रेडीयम पट्ट्या किंवा अन्य खूण न लावता किंवा टँकर डोझर, टिप्पर किंवा क्रेनच्या मदतीने बाजूला हटविण्याची तसदी रामतीर्थ पोलिसांनी घेतली नाही़ २५ एप्रिल रोजी शेख बाबूमियॉ हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका चिटमोगरा येथील नातेवाईकांना देवून रात्री पावणेआठच्या सुमारास शंकरनगर-नरसी दरम्यान असलेल्या हिप्परगामाळ जवळील घटनास्थळाजवळ आले़ ते आपल्या डाव्या बाजूने जात असताना समोरून आलेल्या वाहनाच्या उजेडामुळे ते टँकरच्या मागच्या बाजूस धडकले़ या धडकेमुळे त्यांच्या डोक्याचा भाग कापला गेला़ त्यामुळे ते जागीच ठार झाले़ रामतीर्थ पोलिसांनी टँकर जागेवरून हटविले नसल्यामुळेच हा अपघात घडला. दरम्यान, प्रकरण अंगावर येण्याची शक्यता वाटताच रामतीर्थ पोलिसांनी २६ एप्रिल रोजी सकाळी ८ च्या सुमारास डोझरच्या सहाय्याने टँकर रस्त्याच्या बाजूला सरकवून प्रकरण सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)