शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस

By admin | Updated: June 23, 2014 00:33 IST

औरंगाबाद : मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंधरा दिवसांच्या पहिल्या नक्षत्रात जेमतेम सरासरी २९ मि. मी. पाऊस झाला.

औरंगाबाद : मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंधरा दिवसांच्या पहिल्या नक्षत्रात जेमतेम सरासरी २९ मि. मी. पाऊस झाला. गतवर्षी आतापर्यंत म्हणजे १ जून ते २० जून या काळात सरासरी ११२ मि. मी. पाऊस झाला होता. तसेच मागील वर्षी विभागात आतापर्यंत जवळपास ५० टक्के पेरण्या उरकल्या होत्या. यंदा मात्र पेरण्यांना अजून सुरुवातही होऊ शकलेली नाही.
गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यात यंदा आशादायी चित्र होते. चांगला पाऊस होण्याच्या अपेक्षेने बळीराजाने खरीप हंगामाची तयारी आधीच करून ठेवली होती. मात्र, पावसाने यंदा हुलकावणी दिली आहे.
रविवारी मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्र लागले. मृग नक्षत्रात मराठवाड्यात कुठेही पुरेसा पाऊस झालेला नाही. विभागात १ जूनपासून २१ जूनपर्यंत सरासरी २९ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. त्यातही औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सरासरी त्याहीपेक्षा कमीच आहे. मागील वर्षी याच काळात मराठवाड्यात ११२ मि. मी. पाऊस झाला होता. वार्षिक सरासरीचा विचार करता हा पाऊस १४ टक्के इतका होता.
कमी पावसामुळे यंदा मराठवाड्यात अद्याप पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही. मागील वर्षी आतापर्यंत सर्व आठही जिल्ह्यांत सरासरी ५० टक्के पेरण्या झाल्या होत्या. तर ३० जूनपर्यंत शंभर टक्के पेरण्या झाल्या होत्या. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मराठवाड्यातील पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही ७७९ मि. मी. इतकी आहे. गतवर्षी १ जून ते २० जून या काळात विभागात सरासरी ११२ मि. मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत अवघा २९ मि. मी. पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३.७४ टक्के इतके आहे. गतवर्षी ते १४ टक्के होते.
(१ जून ते २० जूनदरम्यानचा पाऊस मि. मी. मध्ये)
जिल्हायंदागतवर्षी
औरंगाबाद१८१२०
जालना१८१२०
परभणी३३८७
हिंगोली२११७२
नांदेड२५१४५
बीड३१८७
लातूर५०९२
उस्मानाबाद३३७१
एकूण२९११२