शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मघा’वर पावसाची मदार

By admin | Updated: August 17, 2014 00:54 IST

यशवंत परांडकर, नांदेड रोहिणी वगळता आतापर्यंतच्या पाचही नक्षत्राने म्हणावी तशी साथ दिली नाही.

यशवंत परांडकर, नांदेडरोहिणी वगळता आतापर्यंतच्या पाचही नक्षत्राने म्हणावी तशी साथ दिली नाही. पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत़ उगवलेल्या पिकांना दिलासा देत किमान पेयजलाचा तरी प्रश्न मार्गी लागावा़ याची मदार आता सर्वस्वी मघा नक्षत्रावर अवलंबून आहे़ कोल्हेकुई ऐकू जाईल अन् वरुणराजा बरसेल या अपेक्षेने शेतकरी आभाळाकडे पाहत आहे़ मघा नक्षत्र १६ आॅगस्ट रोजी सुरु झाले असून २९ आॅगस्टपर्यंत राहणार आहे. नक्षत्राचे वाहन ‘कोल्हा’ आहे. हे नक्षत्र काही अनियमितता दाखविल तर काही ठिकाणी ओढ लावेल, असे जाणकारांचे मत आहे. मघा नक्षत्राच्या ‘कोल्ह्या’ ने पाऊस आणला तर पिके तग धरु शकतील, शिवाय जलसाठ्याची पाणीपातळी वाढीस लागेल़ पोळा सण जवळ आला तरी अद्याप म्हणावा तसा मोठा पाऊस झाला नाही. पावसाच्या अपेक्षेने जिल्ह्यातील बहुतांश भागात केलेली धुळपेरणी मातीत गेली़ तरीही न खचता शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली़ यावर्षी मृग, आर्द्रा नक्षत्रात पेरणी झाली असती तर मघा नक्षत्रात पिके हाती आली असती. आश्लेषा नक्षत्राच्या मध्याला मुगाच्या शेंगा खायला येतात तर काही ठिकाणी बिटाला नेण्यासाठी शेतकरी तयार असतात. रोहिणी नक्षत्र वगळता मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा ही पाचही नक्षत्रे कोरडी गेली. दुसरीकडे अजून एकदाही नदी, ओढ्यांना पूर आला नाही. मघा नक्षत्रात पाऊस पडावा, यासाठी शेतकरी देव पाण्यात ठेवून आहेत. या नक्षत्रात चांगला पाऊस पडला तरच स्थिती काहीसी बदलेल़एकंदर मघा नक्षत्रातील पावसावरच पिकांची दारोमदार असल्याची माहिती हदगाव तालुक्यातील शेतकरी गजानन लोमटे, मुदखेड तालुक्यातील दिगंबर चव्हाण, अर्धापूर तालुक्यातील सूर्यकांत कदम यांनी दिली.