शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बांधकाम परवानगीचे रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 01:15 IST

औरंगाबाद : महापालिकेत बोगस भोगवटा प्रमाणपत्र देणारी टोळी मागील महिन्यात उघडकीस आली होती.

औरंगाबाद : महापालिकेत बोगस भोगवटा प्रमाणपत्र देणारी टोळी मागील महिन्यात उघडकीस आली होती. या टोळीने शहरात अनेक बिल्डरांनाही बोगस बांधकाम परवानगी दिल्याचे समोर येत आहे. मात्र, पोलीस तपासात किती जणांना आणि कधी ही परवानगी दिली हे सापडत नाही. महापालिकेनेही यासंदर्भात कोणतीही चौकशी सुरू केलेली नाही.शेख रियाज (४०, रा. काळा दरवाजा), दशरथ आदमाने (५६, रा. रेणुकामातानगर, गारखेडा) आणि जयराम बुळे (४५, रा. विशालनगर, गारखेडा) यांनी सेव्हन हिल कॉलनी येथील रहिवासी प्रवीण चौधरी यांना बोगस भोगवटा प्रमाणपत्र दिले होते. या प्र्रकरणात ५ जून रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटकही केली होती. या टोळीने शहरात आणखी काही जणांना बोगस भोगवटा आणि बांधकाम परवानगी दिल्याचे समोर येत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून हा कुटीर उद्योग सुरू होता. प्रवीण चौधरी यांच्या जागरूकतेने या टोळीचा पर्दाफाश झाला होता.बोगस भोगवटा प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीने काही बिल्डरांना चक्क बांधकाम परवानगीही बनवून दिली आहे. या बांधकाम परवानगीच्या आधारावर अनेक बँकांनी या बिल्डरांना कोट्यवधी रुपयांचे कर्जही दिले आहे. सिटीचौक पोलिसांनी तपासात अनेक बाबींचा अभ्यास केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी सांगितले. आरोपींनी यापूर्वी काही जणांना असे बोगस प्रमाणपत्रे दिलेली आहेत. कोणाला दिले, कधी दिले हे समोर आलेले नाही. महापालिकेकडून यासंदर्भात अधिक तपशील कळविण्यात आलेला नाही.महापालिकेत बोगस भोगवटा प्रमाणपत्र देणारी टोळी असल्याचे उघडकीस आल्यानंतरही मनपा प्रशासनाने यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. मागील दोन-चार वर्षांमध्ये आणखी काही बोगस बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र दिल्याची तपासणी केली नाही. मनपाच्या नगररचना विभागाने बारीक तपासणी केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील. कारण या टोळीने मनपाच्या रेकॉर्डमध्ये बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रे दिल्याच्या नोंदी करून ठेवल्या आहेत.