लिपिकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार- टोपे

By Admin | Updated: July 21, 2014 00:24 IST2014-07-20T23:20:36+5:302014-07-21T00:24:45+5:30

जालना : जिल्हा परिषदेतील लिपिक हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करून वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू,

The questions of the clerical wage will be resolved - Tope | लिपिकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार- टोपे

लिपिकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार- टोपे

जालना : जिल्हा परिषदेतील लिपिक हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करून वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या विभागीय मेळाव्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर होत्या. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश दाभाडकर, सचिव बापूसाहेब कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुुख, जिल्हाध्यक्ष रामधन कळंबे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पालकमंत्री टोपे आपल्या भाषणात म्हणाले की, लिपिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कॅबिनेट बैठकीत आपण आग्रही भूमिका घेणार आहोत. कर्मचाऱ्यांना सुधारित आकृतीबंध लागू व्हावा, यासाठी आपण अर्थमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. वेतनाच्या प्रश्नासह अन्य प्रश्नही मार्गी लावू, असे आश्वासन टोपे यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, दाभाडकर, कुलकर्णी यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक रामधन कळंबे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोडले यांनी केले. मेळाव्यात विविध सत्रात मराठवाड्यातून आलेल्या जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने विविध प्रश्नांबाबत शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यासंबंधी माहितीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून दिली. त्याचप्रमाणे आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
या मेळाव्यास मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मेळाव्याची सांगता सायंकाळी झाली. (प्रतिनिधी) $ि$िलपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यातून आपल्या भाषणातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, असा सूर लावला. गेल्या अनेक दिवसांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. प्रत्यक्षात प्रश्न दूर व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या मेळाव्यास मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपूर्वीही जालन्यात विभागीय मेळावा घेण्यात आला होता.

Web Title: The questions of the clerical wage will be resolved - Tope