शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानसोबतचा प्रश्न चर्चेतूनच मिटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:27 IST

सीमेवर युद्धाच्या तयारीनिशी आलेल्या चीनसोबत चर्चा होऊ श्कते तर पाकिस्तानशी चर्चा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तानमधील संबंध हे चर्चेद्वारेच सुधारतील असा विश्वास जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सीमेवर युद्धाच्या तयारीनिशी आलेल्या चीनसोबत चर्चा होऊ श्कते तर पाकिस्तानशी चर्चा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तानमधील संबंध हे चर्चेद्वारेच सुधारतील असा विश्वास जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.फारुख अब्दुल्ला हे बुधवारी नांदेडमध्ये श्री सचखंडगुरुद्वारा येथे दर्शनासाठी आले होते. नांदेडमध्ये श्री सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्याची आपली अनेक दिवसांपूर्वीची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. येथे आल्यानंतर मोठे समाधान झाल्याचे ते म्हणाले.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत-पाकिस्तानमधील संबंधांमुळे आज काश्मीर घाटीत अशांतता आहे. परिणामी काश्मीरचा विकास रखडला आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध चर्चेतूनच सुटतील. दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत. जगात सर्व काही बदल होऊ शकतो मात्र शेजारी बदलता येत नाही, असेही ते म्हणाले. सीमेवर उभ्या असलेल्या चीनसोबत भारत चर्चा करत आहे. मग पाकिस्तानशी चर्चा नको? असा सवालही त्यांनी व्यक्त केला.देशातील आजच्या परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त करताना देशात आज लोकांना जोडण्याऐवजी तोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी धर्माचा वापर होत आहे. ही बाबही अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले. धर्माचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यात कुणीही हस्तक्षेप करु नये असेही ते म्हणाले. देशात झालेल्या नोटाबंदीमुळे आतंकवाद्यांना मिळणारी मदत बंद होईल, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र आजही आतंकवादी देशात सर्वसामान्यांचा बळी घेत आहेत. नोटाबंदीच्या माध्यमातून किती काळा पैसा बाहेर आला हे सरकारने घोषित करावे, असे सांगताना अब्दुल्ला यांनी नोटाबंदीतून सामान्यांचेच मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. काश्मीर हा भारतातच भाग असून या भागात भारतातीलच नागरिक येण्यास धजत नाहीत. देशातील नागरिकांनी येथे ये-जा केल्यास काश्मिरींमध्येही विश्वासाची भावना बळावेल. काश्मीरमध्ये भारतीयांनी येण्याचे आवाहनही त्यांनी केले.