शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणाऱ्यांना दणका; वनक्षेत्रात ‘ओली पार्टी’ करणाऱ्यांना ‘उठबशा’ची शिक्षा

By साहेबराव हिवराळे | Updated: June 2, 2025 15:40 IST

खबरदार! वनविभागाचे नियम धाब्यावर बसवाल तर खैर नाही !

छत्रपती संभाजीनगर : देवळाई-सातारा येथील साई टेकडी वरचा परिसर हा वन क्षेत्रात येतो. या परिसरात नागरिकांनी विनापरवानगी प्रवेश केल्यास आणि मद्यप्राशन केल्यास वन्यजीव आणि पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. वन विभागाने यापूर्वीच कठोर सूचना दिल्या आहेत. तरीदेखील अनेक नागरिक रविवारची सुटी साजरी करण्यासाठी या निसर्गरम्य पण संवेदनशील परिसरात मद्यप्राशन करत असल्याचे प्रकार पुन्हा समोर आले आहेत. अशांना जागेवरच ‘उठबशा’ काढण्यास भाग पाडले आहे.

१ जून, रविवार रोजी वन परिमंडळ अधिकारी अविनाश राठोड यांनी गस्त पथकासह साई मंदिर, वन परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या काही व्यक्तींना रंगेहाथ पकडले. हे सर्वजण वनक्षेत्रात ‘ओली पार्टी’ करत होते. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत संबंधित व्यक्तींना दंड ठोठावला. विशेष म्हणजे, आर्थिक दंडाबरोबरच शिक्षेचा भाग म्हणून त्यांना जागेवरच ‘उठबशा’ काढण्यास भाग पाडले.

वन क्षेत्रात मद्यप्राशन करणे, प्लास्टिक व कचरा टाकणे, विनापरवानगी भटकंती करणे, हे वन कायद्यानुसार दंडनीय गुन्हे आहेत. या प्रकारांमुळे फक्त पर्यावरणाची हानी होते असे नव्हे तर नागरिकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते, त्यामुळे येथे फिरणे धोकादायक ठरू शकते. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वन क्षेत्रात फिरण्यासाठी अधिकृत परवानगी घ्या. मद्यप्राशन, ध्वनिप्रदूषण आणि कचरा टाकणे टाळा. वन्यप्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप टाळणे आपल्याच सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.

या कारवाईमुळे इतर नागरिकांनाही चांगला धडा मिळाला असून, वन विभागाने याविषयी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. पुढील काळात अशा गैरप्रकारांवर अधिक कडक कारवाई होणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. आता पुन्हा येणार नसल्याची शपथ घेतल्यानंतर समज देऊन सोडण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर