शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचावर बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव

By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST

हिंगोली : बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ंहिंगोली : आखाडा बाळापूर येथील विविध विकासकामांच्या अनियमिततेबाबत जि. प. च्या स्थायी समितीत झालेल्या बैठकीत आज सरपंच व उपसरपंचावर कलम ३९ (१) अंतर्गत बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, सभापती राजाभाऊ मुसळे, रंगराव कदम, मधुकर कुरुडे, निलावती सवंडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांची उपस्थिती होती. बैठकीत बोलताना अध्यक्षा बोंढारे यांनी सुरुवातीलाच या प्रकरणात अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगून योग्य तो प्रस्ताव सादर करा, असे सांगितले. त्यानंतर अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. त्यात संपूर्ण स्वच्छता अभियानात बाळापूर येथे २0१0-११ या वर्षात मंजूर शौचालयाच्या युनिटचे प्रत्येकी १ लाख ७५ हजार रुपयाप्रमाणे १२ लाख ६0 हजार ग्रा. पं. ला दिले होते. त्यात ३ युनिटचे मूल्यांकन ५.0४ लाख झाले. तर ४.२७ लाख शिल्लक असल्याचे म्हटले. उर्वरित तीनपैकी एकच काम पूर्ण असून दोन सुरू आहेत, असे अहवालात म्हटले.
कचराकुंडी खरेदीबाबत मिळालेले ९५ हजार ४0 कुंड्या खरेदीसाठी वापरले. मात्र प्रत्यक्षात ९ कुंड्या तपासणीत आढळल्या. त्याचा पंचनामा सादर करण्यात आला. तर आवश्यकता नसताना ७ बाजार ओट्यांचे बांधकाम पाडण्यात आले. त्यात ज्या व्यापाऱ्यांचे गाळे ओट्याला लागून आहेत. त्यांच्यांवर संशयित म्हणून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास गटविकास अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
ग्रा. पं. ज्या जागा ठरावाशिवाय करारनामे करून भाडेचिठ्ठीने दिल्या ते सर्व करारनामे रद्द करण्याचे पत्रही गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर सरपंच मारोती शंकरराव खरोडे व उपसरपंच म. इसाक कुरेशी यांनी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत अधिनियमचे कलम ३९ (१) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जि. प. कडे गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केला. तो जि. प. ने आयुक्तांकडे पाठविला असल्याचे सांगण्यात आले.
यावर जि. प. सदस्य गजानन देशमुख यांनी अनियमितता सिद्ध करण्यासाठी अधिकाऱ्यांची चौकशी समिती वा स्थायीची समिती नेमून ही कारवाई करायला हवी होती. गटविकास अधिकाऱ्यांनी थेट अहवाल कसा काय सादर केला. त्याला काय आधार आहे. ही बाब आम्हाला मान्य नसल्याचा मुद्दा मांडला.
(जिल्हा प्रतिनिधी)