शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ॲपवर नफ्याचे आकडे, पण पैसे मिळेना; शेअर मार्केटच्या नावाने निवृत्त प्राचार्याला ३१ लाखांचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 19:41 IST

सायबर गुन्हेगारांनी ॲपद्वारे कसा घातला गंडा? वाचा निवृत्त प्राचार्यांची आपबिती.

छत्रपती संभाजीनगर : गुंतवणुकीसंदर्भात बनावट अॅप इन्स्टॉल करण्यास सांगून सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त प्राचार्याला तब्बल ३१ लाख ७ हजारांचा गंडा घातला. २१ एप्रिल रोजी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

६९ वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना व्हॉट्स अॅपवर दोन अज्ञात क्रमांकावरून गुंतवणुकीबाबत माहिती देणारी सुंदरम मार्केट मास्टर्स वेबसाईटची लिंक प्राप्त झाली. त्यावर क्लिक करताच तक्रारदाराला दाेन व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यात प्रत्येकजण त्यांचा सदर कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर कसा फायदा झाला, असे सांगत होता. त्याच दरम्यान तक्रारदाराला कायरा शर्मा नामक महिलेने संपर्क केला. गुंतवणूक केल्यास २० ते ३० टक्के परताव्याचे आमिष दाखवले. त्यासाठी मोबाइलमध्ये ‘एसडीएएमसी’ व ‘एसडीएएमसीएचडी’ हे दोन अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले.

५ हजारांपासून केली सुरुवात...तक्रारदाराने सुरुवातीला सदर दोन्ही अॅपमध्ये ५ हजारांची गुंतवणूक केली. तीन महिन्यांमध्ये तक्रारदाराने एकूण ३१ लाख ७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. तक्रारदाराने सर्व पैसे सुंदरम ट्रेडिंग नावाच्या बँक खात्यावर ऑनलाइन पाठवले.

अॅपवर नफा दिसत होता मात्र ‘आभासी’तक्रारदार पैसे पाठवत होता. तसे त्यांनी इन्स्टॉल केलेल्या अॅपमध्ये त्यांच्या गुंतवणुकीवर २० ते ३० टक्के परतावा मिळत असल्याचे दिसत होते. हे सर्व पैसे आपण काढून घेऊ शकतो, असे तक्रारदाराला वाटत राहिले. तीन महिन्यांनंतर त्यांनी नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी कायरा शर्माला याबाबत विचारताच त्यांना ब्लॉक करण्यात आले आणि त्यानंतर अॅप, त्यावर दिसणारे नफ्याचे आकडे दोन्ही बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय, व्हॉट्सअॅप ग्रुपवर नफा मिळाल्याचे मेसेज करणारे क्रमांकही त्यांच्याच टोळीचा भाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Retired Principal Duped of ₹31 Lakh in Share Market Scam

Web Summary : A retired principal lost ₹31 lakh to cybercriminals through a fake investment app promising high returns. Initially seeing profits, he was later blocked when trying to withdraw funds, revealing the scam.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी