शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या अंमलबजावणीतील चुकीमुळे देश आर्थिक संकटात - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 20:50 IST

वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही ऐतिहासिक नवीन करप्रणाली आहे. करप्रणाली चांगली आहे पण केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली आहे. परिणामी, संपूर्ण देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजीएसटी ही ऐतिहासिक नवीन करप्रणालीअंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने अमेरिकी बँकांनी मोदींना गंडावले

औरंगाबाद : वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही ऐतिहासिक नवीन करप्रणाली आहे. करप्रणाली चांगली आहे पण केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली आहे. परिणामी, संपूर्ण देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सरकार हट्टी असल्याने ते विरोधी पक्षांनी सुचविलेले सुधारणा मान्यास तयार नाही. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी आता जनतेने एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे स्पष्ट विचार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे मांडले.भारतीय अर्थव्यवस्था, भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या विषयांवरील गुरुवारी सायंकाळी आयोजित व्याख्यानात त्यांनी उद्योजक, व्यापारी, सीए, करसल्लागार यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचे आयोजन जिल्हा व्यापारी महासंघ, सीए संघटना व कर सल्लागार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. जीएसटीमुळे उद्योग, व्यवसायात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरील भाष्य करणा-या व भविष्यातील अर्थव्यवस्थेचे वेध घेणा-या हे व्याख्यान ऐकण्यासाठी तापडिया नाट्यमंदिर हाऊसफुल झाले होते. चव्हाण पुढे म्हणाले की, जीएसटीच्या अमलबजावणीसाठी दोन ते तीन महिन्याचा अवधी वाढवून देणे आवश्यक होते. २००३ ते २०१० पर्यंत अर्थिक विकास सुवर्णकाळ मानला जातो. या कालावधीत जीडीपी ९ टक्कांपर्यंत जाऊन पोहोचला. मागील तीन वर्षात जीडीपीदर वेगाने खाली उतरला आहे. यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत अवघ्या ५.७ टक्केवर पोहोचला आहे. सरकार जीडीपीदर फुगवून सांगत आहे. मुळात ३.५ टक्क्यांपर्यंत जीडीपीदर खाली येऊन ठेपला आहे. जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीचा फटका संपूर्ण देशवासीयांना भोगावा लागत आहे.अर्थव्यवस्थेत सुधारणा येण्यासाठी आणखी दोन तिमाही लागणार आहे. जीएसटीचा घाईत निर्णय घेण्यात आला. सरकारी अधिका-यांना त्याविषयी अधिक माहिती नाही, सॉफ्टवेअर सिस्टीम सक्षम नाही, असेही त्यांनी विविध उदाहरण देऊन देशाची अर्थव्यवस्थेची सत्यपरिस्थिती समोर मांडली. प्रास्ताविकात, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा म्हणाले की, जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीचा ताण उद्योग-व्यापा-यांवर आला आहे. व्यवसायिकांची मर्यादा लक्षात घेण्यात येत नाही. अंतर्गत व्यापार धोरण राबवा व व्यापाºयांना नफा नको करवसूलीतील कमिशन द्या, अशी मागणी त्यांनी केली. प्रमुख पाहूण्यांचा परिचय सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावक यांनी केले. यावेळी आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, राम भोगले आदीं उद्योजक,व्यापारी,सीएची उपस्थिती होती.अमेरिकी बँकांनी मोदींना गंडावलेनोटाबंदीच्या विषयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला की, नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आला. अमेरिकी बहुराष्ट्रीय बँकांनी क्रेडीट कार्ड खपविण्यासाठी नोटाबंदी अंमलात आणण्याचा चुकीचा सल्ला देऊन मोदींना गंडावले. क्रेडीट कार्डच्या व्यवहारावरील कमिशन नियंत्रणात आणण्याचा सल्लाही चव्हाण यांनी दिला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण