शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा नोंदविण्यासाठी प्रेत दीड तास ठाण्यात

By admin | Updated: June 22, 2014 00:05 IST

माजलगाव: पैशाच्या व्यवहारात मध्यस्थी असलेल्या एका तरुणाने तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली़

माजलगाव: पैशाच्या व्यवहारात मध्यस्थी असलेल्या एका तरुणाने तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली़ त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली़ प्रेत थेट ग्रामीण ठाण्यात आणले़ नातेवाईकांनी प्रेतासह ठाण्यात दीड तास ठिय्या मांडला़ फिर्याद नोंदविल्यावरच नातेवाईकांनी प्रेत उचलले़ गोकुळ आप्पासाहेब शिंदे (वय ३४ रा़ मनूरवाडी ता़ माजलगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे़ माजलगाव शहरातील अशोकनगर भागातील सचिन संभाजी जावळे याच्याकडून योगेश रमेश लऊळकर (रा़ नवीन बसस्थानक, माजलगाव) याने ३० हजार रुपये व्याजाने घेतले होते़ शिंदे, लऊळकर व जावळे हे तिघे मित्र आहेत़ लऊळकरचे पादत्राणांचे दुकान असून शिंदे हा वाहनचालक म्हणून काम करायचा़ लऊळकर, जावळे यांच्या पैशाच्या व्यवहारात शिंदे यांनी मध्यस्थाची भूमिका निभावली होती़ मुदत संपूनही लऊळकरने जावळे याचे पैसे परत केले नाहीत़ इकडे जावळे याने पैशासाठी शिंदेंकडे तगादा लावला होता़ १६ जून रोजी तर जावळे याने शिंदे यांच्या घरी जाऊन ‘पैसे दे, अन्यथा घरातील सामान उचलून नेईल’ अशी धमकी दिली होती़ तेव्हापासून शिंदे अस्वस्थ होते़ १७ रोजी त्यांनी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले़ त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले़ उपचार सुरु असताना शनिवारी दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला़ नातेवाईक बसले आडूनसंतप्त नातेवाईकांनी पैशाच्या तगाद्याला कंटाळूनच गोकुळ यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करुन प्रेत ग्रामीण ठाण्यात आणले़ सचिन जावळे व योगेश लऊळकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या मागणीवरुन नातेवाईक आडून बसले़ त्यानंतर फौजदार छबुराव सोनवणे यांनी नातेवाईकांची समजूत काढली़ शिवाय गुन्हाही नोंदविला़ त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत तेथून हलविले़ मनूरवाडीत सायंकाळी बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले़ (वार्ताहर)