शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भाव वाढले

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.

जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.खरीप व रबी पिकासोबतच अनेक शेतकी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. वेळेत पाऊस न झाल्याने तसेच उपलब्ध पाण्याचा साठाही आटत आल्याने सर्वच फळे तसेच पालायुक्त भाज्यांची अवस्था नाजूक असल्याचे उत्पादक सांगतात. पाणीच नसल्याने नवीन उत्पादन घेण्यास मर्यादा येत आहेत. जालना शहरात कारला, गोंदेगाव, जामवाडी, बठाण, गोलापांगरी, नाव्हा, बुटेगाव, काजळा, सिरसवाडी आदी खेड्यातून भाजीपाला येतो. यात प्रामुख्याने कारले, दोडके, काकडी, मिरची, टोमॅटो, पालक, चुका, कोथंबीर, फुलगोबी, पानगोबी, गवार वांगे, भेंडी, शेवगा आदी भाजी पाल्याची मिळून ३० ते ४० क्विंटल आवक होते. काही शेतकरी थेट बाजारात विक्री करतात. रविवार बाजारात नागरिक व व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रियांतून आवक व भाववाढीचा विषय चांगलाच चिघळला होता. कारला येथील बारामही भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे दत्तात्रय गोरे म्हणाले, पावसाअभावी खरीप हंगाम तर बिघडलाच आहे. आता भाजीपाला उत्पन्नावरही संक्रांत येण्याच्या मार्गावर आहे. मोठा पाऊस नसल्याने पाणीपातळी घटत आहे. लावलेल्या भाजीपाल्यास पाणी देणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावरील रोग वाढत आहे.पुंजाराम टाके यांनीही पाऊस नसल्याने भाजीपाल्यावर विपरित परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास लावलेला भाजीपालाही वाया जाण्याची भीती व्यक्त केली. जालना अथवा रामनगर येथील बाजारपेठेत भाजीपाला विक्री करतो. दोन महिन्यांपासून उत्पादन जेमतेम निघत आहे, असे सांगितले.रविवारच्या बाजारात भेंडी ६० ते ८० रुपये, वांगे ५०, कोबी ४०, दोडके ६० रुपये, गवार ४० ते ७०, काकडी ६० रुपये किलो तर पालक मेथी, कोथिंबिरीची एक जुडी चार रुपये याप्रमाणे विक्री झाली.(प्रतिनिधी)पावसाची पाठयेथील बाजारपेठेत जालना तालुक्यातील परिसरातील गावांमधून तसेच बाहेर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाजी पाल्याची आवक होते. यावर्षी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याने भाजीपाला उत्पादनावर त्याचा मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात विहिरीला पाणी आहे, असे बागायतदार शेतकरी भाजीपाला घेतात. मात्र पावसाअभावी विहिरीची पाणीपातळी खालवल्याने त्याची उत्पादकांनाही मोठी झळ बसत आहे.उत्पादकांनीवाढविले भाव जालना येथील रविवारच्या आठवडी बाजारात बहुतांश उत्पादक भाज्यांची थेट विक्री करतात. यामुळे भावही सर्व सामान्य जनतेला परवडेल असा असतो; पण दोन आठवड्यांपासून उत्पादकांनीही चांगलेच भाव वाढविल्याचे अनेकांनी सांगितले. यामुळे या बाजारात तसेच भाजी मंडईतील भावात काहीच फरक नाही.