शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

अवैध कामे करणाऱ्यांना रोखा

By admin | Updated: December 16, 2015 00:18 IST

औरंगाबाद : बारकोड उत्तरपत्रिका खरेदी प्रकरणाची आता राज्यपालांमार्फत चौकशी जाहीर झाल्यानंतर आता विद्यापीठात अवैध कामे करणाऱ्यांना चाप बसायला हवा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

औरंगाबाद : बारकोड उत्तरपत्रिका खरेदी प्रकरणाची आता राज्यपालांमार्फत चौकशी जाहीर झाल्यानंतर आता विद्यापीठात अवैध कामे करणाऱ्यांना चाप बसायला हवा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुमारे ७६ लाख रुपयांच्या बारकोड उत्तरपत्रिका खरेदी करताना निविदा पद्धतीचा वापर न करता खरेदी करण्यात आली. या प्रकरणी सिनेटच्या चौकशी समितीने दोषी ठरविल्यानंतरही कुलगुरू आणि अधिकार नसलेल्या सिनेटने नोव्हेंबर महिन्यात स्वत:ला या प्रकरणातून ‘क्लीन चिट’ मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा हा प्रयत्न विधान परिषदेतील या विषयावरील चर्चेने सफल झाला नाही. उलट राज्यपालांमार्फत या प्रकरणाची पुन्हा चौकशी लागली. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे आणि तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य उल्हास उढाण म्हणाले की, बारकोड उत्तरपत्रिका खरेदीचा विषय खरेदी समितीसमोर न येता खरेदी झाली. त्यावेळीच या प्रकरणात काहीतरी गैरप्रकार झाला असल्याची शंका आली. म्हणून विद्यापीठाच्या सिनेटमध्ये या प्रकरणाची चौकशी समिती स्थापन करावी लागली. आता राज्यपाल कार्यालयामार्फत या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार असल्याने या प्रकरणातील सत्य समोर येईल. विधिमंडळाने दिलेले चौकशीचे आदेश म्हणजे एक प्रकारे ठपकाच असून, अशा प्रकरणात कुलगुरूसारख्या व्यक्तीने राजीनामाच दिला पाहिजे. महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन (मुप्टा)चे डॉ. संभाजी वाघमारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नियम डावलून खरेदीची प्रक्रिया राबविणे म्हणजे गैरप्रकारच आहे. विद्यापीठाने शैक्षणिक आणि परीक्षा फीरूपाने जमा केलेल्या विद्यार्थ्यांच्या रकमेचा हा अपहारच म्हणावा लागेल. त्यामुळे या प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पाच लाख उत्तरपत्रिका शिल्लक असताना नव्या उत्तरपत्रिका का खरेदी करण्यात आल्या हे कोडेच आहे.