शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

वधूपित्यांची बजेट वाढविण्याची तयारी; शाही लग्नात देशी पदार्थांसोबत पिझ्झा, पास्ताचे फ्यूजन

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 3, 2024 14:14 IST

शाही लग्नात देशी-विदेशी व्यंजनांचा आस्वाद; शेवटी लग्न सोहळ्याची संपूर्ण मदार ‘जेवणा’वरच असते.

छत्रपती संभाजीनगर : शाही लग्नामध्ये देशी पदार्थांसोबत युरोपियन, मेक्सिकन, जपानी, चिनी पदार्थांचे खास काउंटर असतेच; पण आता भारतीय पदार्थ व चीनमधील खास पदार्थांना एकत्र करून फ्यूजन टेस्ट बनविली जात आहे. तसेच मराठमोळी लग्नातील सुरुची भोजनात पिझ्झा व पास्ताचाही शिरकाव झाला आहे. हेच यंदाच्या लग्नसराईचे वैशिष्ट्य ठरत आहे. खवय्येही या नवीन चवीचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

लग्न किती थाटामाटात करा, डोळे दिपविणारी भव्य-दिव्य सजावट, संगीत पार्टी, महागडे रिटर्न गिफ्ट सर्व काही करा त्याचे कौतुक होणारच, पण जेवणाची भट्टी जमली नाही तर सर्वांचा हिरमोड होऊ शकतो. शेवटी लग्न सोहळ्याची संपूर्ण मदार ‘जेवणा’वरच असते.

शाही लग्नात देशी-विदेशी व्यंजनांचा आस्वादशहरात शाही लग्न सोहळे पार पडत आहेत. यात देशी-विदेशी पदार्थांचे २७ पेक्षा अधिक प्रकार व ३९ पेक्षा अधिक काउंटर खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे. यात युरोपियन, मेक्सिकन, जपानी, चिनी देशातील प्रसिद्ध पदार्थांचे स्टॉल आहेत. थंडीचे दिवस लक्षात घेऊन स्ट्रीम फूड व लाइव काउंटर फूड स्टॉलला मागणी वाढली आहे. तव्यावरील गरम गरम पदार्थ खाण्यात मजा येते. आता यात केटरर्सनी आणखी नावीन्य आणले आहे. दोन देशांतील प्रसिद्ध पदार्थ एकत्र करून नवीन डिश तयार केली जात आहे. दक्षिण भारतातील पदार्थ व त्यात चायनीज पदार्थ मिक्स करणे, किंवा इटालियन व चायनीज पदार्थ मिक्स केल्याने फ्यूजन टेस्टचा आनंद पाहुण्यांना मिळत आहे.

दर्जेदार, उत्कृष्ट चवदार पदार्थावर खर्चशाही भोजनात गुणवत्तेवर जास्त भर दिला जातो. जास्त पैसा खर्च केला जातो, पण पदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड केली जात नाही. दर्जेदार, शुद्ध, उत्कृष्ट चवदार पदार्थांसोबत आता काउंटरच्या ठिकाणची स्वच्छता, विनम्र वेटर्स व वऱ्हाडींसमोर ‘डिश’ सादर करण्याची पद्धत या बाबीवर भर दिला जात आहे, असे केटरर्स व्यावसायिकांनी नमूद केले.

बजेट वाढविण्याची तयारीमराठमोळ्या लग्नातील सुरुची भोजनात सात्त्विक पदार्थ असतात. त्यात थंडीच्या दिवसात गुलाबजाम, गाजराचा हलवा, मुगाचा शिरा, जिलेबी असते. उन्हाळ्यातील लग्नात आइस्क्रीम व कुल्फीनेस्थान मिळविले. आता मुले व तरुणाईमध्ये प्रिय असलेले पिझ्झा व पास्ताने शिरकाव केला आहे. यासाठी बजेट वाढविण्याची तयारीही वधूपित्यांनी ठेवली आहे. अशी माहिती केटरर्स व्यावसायिकांनी दिली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfoodअन्नmarriageलग्न