दहावी बारावीच्या परीक्षांसाठी बैठक व्यवस्थेची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:02+5:302021-02-05T04:13:02+5:30
एका बाकावर एक विद्यार्थी : नवीन परीक्षा केंद्रांसाठी प्रतिसाद वाढला, ५४ प्रस्ताव दाखल --- औरंगाबाद : दहावी बारावीच्या परीक्षा ...

दहावी बारावीच्या परीक्षांसाठी बैठक व्यवस्थेची तयारी सुरू
एका बाकावर एक विद्यार्थी : नवीन परीक्षा केंद्रांसाठी प्रतिसाद वाढला, ५४ प्रस्ताव दाखल
---
औरंगाबाद : दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिल व मे महिन्यात होणार आहेत. त्यामुळे बोर्डाकडून या परीक्षेसाठी विद्यार्थी बैठक व्यवस्थेची तयारी सुरू केली असून केंद्र निश्चितीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. नव्या परीक्षा केंद्रांसाठीही प्रतिसाद वाढला असून आतापर्यंत ५४ प्रस्ताव दाखल झाले. परीक्षेला एका बाकावर एक विद्यार्थी वर्गात नागमोडी पद्धतीने बसवण्याची शक्यता आहे. असे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.
परभणी, हिंगोली, बीड, जालना, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांचा औरंगाबाद विभाग असून या विभागातून ५४ प्रस्तावांची या केंद्रांची परवानगीपूर्व पाहणीचे व्हिडिओ चित्रण केले जाणार आहे. या केंद्रांना कार्यालय अधिकारी, संबंधित शाखेचा प्रमुख, विभागीय सचिव, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या समितीद्वारे पाहणीत परीक्षा केंद्र वस्तीपासून किती दूर आहे, बसण्याची क्षमता, बाकांची व्यवस्था, इतर सोयी सुविधांची त्यात पडताळणी केली जाते. दाखवतांना वेगळी माहिती आणि प्रत्यक्ष परीक्षेवेळी वेगळी व्यवस्था होऊ नये यासाठी व्हिडिओ चित्रण यावेळी करण्यात येणार येईल, असे पुन्ने म्हणाल्या.
प्रश्नपत्रिकांचे संपादन सुरू असून ते काम होत आले आहे. परीक्षा ही लेखी असणार आहे. बैठक व्यवस्थाही पारंपरिक पद्धतीने करूनच होण्याची शक्यता आहे. मात्र, एका बाकावर एक विद्यार्थी बसवण्यात येऊन एकामागे एक न बसवता त्यांना नागमोडी पद्धतीने बसवण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधाच्या उपयायोजना केल्या जातील. राज्य मंडळ सूचना देईल त्यानुसार विभागीय मंडळ काम करेल. विद्यार्थी संख्येनुसार केंद्र कमी पडणार असतील तर प्रशासकीय केंद्र स्थापन केले जाईल, असे पुन्ने यांनी सांगितले.