शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनासाठी इंग्रजीला प्राधान्य

By admin | Updated: August 20, 2014 00:58 IST

औरंगाबाद : पीएच.डी. पूर्वपरीक्षा (पेट) २८ सप्टेंबर रोजी होणार असून आज कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. ‘

औरंगाबाद : पीएच.डी. पूर्वपरीक्षा (पेट) २८ सप्टेंबर रोजी होणार असून आज कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. ‘पेट’साठी आता आणखी विलंब बरा नाही, अशी भूमिका घेत कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत या परीक्षेचा दिनांक जाहीर केला. दरम्यान, ‘लोकमत’ने आज मंगळवारीच २८ सप्टेंबर रोजी ‘पेट’ आयोजित केली जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘नेट’च्या धरतीवर ‘पेट’ घेतली जाईल, असे सांगून कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, या परीक्षेसाठी दोन पेपर राहतील. दोन्ही पेपरमध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. दोन्ही पेपरमध्ये पास होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४०, तर सर्व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ३५ गुणांची अट आहे. या परीक्षेत मराठा व मुस्लिम विद्यार्थ्यांना शासनाने जाहीर केलेले आरक्षण लागू असेल. यासंदर्भात ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे व परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, १५ दिवसांच्या आत ‘पेट’चा निकाल जाहीर करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. विद्यापीठात ‘पेट’संबंधी स्वतंत्र विभाग कार्यरत करण्यात आला असून डॉ. माधव सोनटक्के व डॉ. सचिन देशमुख या दोघा जणांवर समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापुढे वर्षातून दोन वेळा ‘पेट’ आयोजित करण्यासंबंधी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. यावेळी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल कुलगुरूंनी सांगितले की, ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आता अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन वर्षांची वैैधता मान्य करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना अन्य ठिकाणी संशोधन करता यावे, यासाठी त्या विद्यार्थ्यांना ‘पेट’ उत्तीर्णतेचे विद्यापीठ प्रमाणपत्रही देईल. मार्गदर्शकांकडे असलेल्या शिल्लक जागांचा आढावा लवकरच घेऊन तो ‘वेबसाईट’वर प्रसिद्ध केला जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.